जळगावचे आर्कीटेक्ट संदीप सिकची ग्लीट्स पुरस्काराने सन्मानित

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्ली (Delhi) येथील हाॅटेल ललीत येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात जळगावचे क्रिएटिव आणि जिनियस आर्कीटेक्ट संदीप सिकची (Architect Sandeep Sikchi) यांना ग्लीट्स मॅगझीन पुरस्काराने (Gleets Magazine Awards) नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा नामांकीत पुरस्कार एचओडी डीपार्टमेंट ऑफ आर्किटेक्टचर स्कुल ऑफ प्लॅनिंग अँड आर्कीटेक्चर (Department of Architecture School of Planning and Architecture), न्यु दिल्लीचे अनिल धवन यांच्या शुभहस्ते देण्यात आला. ते या पुरस्कारातील नऊ जुरीं पैकी एक मान्यवर जुरी होते. अशी माहिती आर्कीटेक्ट शिरीष बर्वे (Architect Shirish Barve) यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकार परिषदेला आर्कीटेक्ट शिरीष बर्वे, डाॅ चंद्रशेखर सिकची (Dr. Chandrasekhar Sikchi), आर्कीटेक्ट संदिप सिकची (Architect Sandeep Sikchi), आर्कीटेक्ट आदित्य सिकची (Architect Aditya Sikchi) उपस्थित होते.

पुणे येथील नंदकिशोर राठी यांनी त्यांच्या ‘ऑफिस अ‍ॅट आमराई’ या ऑफिसचे काम संदिप यांना दिले. संपुर्ण काम पर्यावरणाची हानी न होऊ देता, जागेचा योग्य वापर, क्रिएटिविटी, बांधकामात स्थानिक वस्तुंचा वापर, त्यातील तंत्रज्ञान, यावर आधारीत संपुर्ण काम केले असल्याने त्याची दखल ग्लीट्सने घेतली व त्यांना नामांकित करुन सम्मानित करण्यात आले. सात कॅटेगरी मध्ये २००+ एन्ट्रीमधुन ‘आर्कीटएक्चर – ऑफिस अँड रिटेल’ कॅटेगरीच्या पुरस्काराकरीता आर्कीटेक्ट संदिप सिकची यांना सन्मानीत करण्यात आल्याचेही शिरीष बर्वे यांनी सांगितले. संदिप यांचे शालेय शिक्षण सेंट जोसेफ स्कुल, महाविद्यालयीन शिक्षण एम. जे. काॅलेज व त्यानंतर एम. एम. काॅलेज ऑफ आर्किटेक्टचर,पुणे तसेच सी. ई. पी. टी. काॅलेज अहमदाबाद येथे झाले. त्यानंतर त्यांनी दोन वर्ष बैंगलोर येथे नोकरी केली. पुण्यात १९९६ स्वत:चे ऑफिस केले. पण डाॅ. चंद्रशेखर सिकची यांचे जळगावला वलय चांगले असल्याने आई वडीलांना पुण्यात बोलावण्यापेक्षा तेच जळगावला आले व येथुन काम सुरू केले.

आर्किटेक्ट संदिप सिकची यांनी जळगांवसह मुंबई, पुणे, बेंगलोर व्यतिरिक्त परदेशात चायनात ऑफिस, हाँगकांग येथे रेस्टोरेंटची कामे केली असुन सध्या ऑस्ट्रेलिया येथे त्यांच्या मार्गदर्शनात बंगल्याचे बांधकाम सुरु आहे. विशेष म्हणजे चित्रपट अभिनेत्री प्रियंका चोपड़ा यांचे घर, ऑफिस व वडीलांच्या मेमोरियल ट्रस्टचे देखिल काम आर्कीटेक्ट संदिप सिकची यांच्या मार्गदर्शनात झाले आहे. संदिप यांना या आधी देखील अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले असुन त्यात आर्टिस्ट इन काँक्रीट अवार्ड : २०१३, फिफ्टी ब्युटीफुल हाऊसेस इन इंडिया या काॅफीटएबल बुक मध्ये देखील संदिप त्यांच्या तीन प्रोजेक्ट्सचा समावेश आहे.

कंस्ट्रक्शन वीक अवार्डसमध्ये देखील त्यांचे नामांकन घोषित झाले आहे. काम करताना क्लाइंट रिक्वायरमेंट, डिझाइन, बजेट नुसार काम तसेच वास्तुशास्त्र व तंत्रज्ञानाची सांगड घालुन काम करण्याची आवड असल्याचे आर्कीटेक्ट संदिप सिकची यावेळी नमुद केले. यावेळी डाॅ चंद्रशेखर सिकची यांच्या देखील कार्याबद्दल त्यांना इंडियन अॅकॅडमी आॅफ पेड्रीअॅटईक तर्फे मिळालेल्या जीवन गौरव पुरस्काराची माहिती देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.