काय सांगता…? Google Pay ॲप होणार बंद !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गुगल पे ॲप भारत, सिंगापूर आणि अमेरिका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. पण आता कंपनीने या ॲपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गुगल आता जुने गुगल ॲप बंद करणार आहे.

Android होमस्क्रीनवर दिसणारे ‘GPay’ ॲप ही जुनी आवृत्ती आहे जी पेमेंट आणि फायनान्ससाठी वापरली जाते. मात्र, भारतातील लोकांना याची काळजी करण्याची गरज नाही कारण कंपनीने हा निर्णय अमेरिकेसाठी घेतला आहे.

अहवालानुसार, GPay 4 जून 2024 पासून अमेरिकेत बंद होईल, भारत आणि सिंगापूरमध्ये GPay वापरणाऱ्या लोकांना काळजी करण्याची गरज नाही कारण GPay या देशांमध्ये सुरळीत काम करेल.

कंपनीने एका ब्लॉगद्वारे ही माहिती दिली की, Google Pay ॲपचा अनुभव सुलभ करण्यासाठी, 4 जूनपासून स्टँडअलोन Google Pay ॲपची अमेरिकन आवृत्ती वापरता येणार नाही. अमेरिकेत ही सेवा बंद केली जाईल, मात्र भारत आणि सिंगापूरमध्ये ही सेवा सुरु राहतील.

ॲप बंद होणार असल्यामुळे गुगलने पीअर-टू-पीअर पेमेंटही बंद केले आहे. ब्लॉगमध्ये असे सांगण्यात आले आहे की, अमेरिकेत गुगल पे ॲप बंद झाल्यानंतर अमेरिकन यूजर्स यापुढे ॲपद्वारे इतर लोकांना पैसे पाठवू शकणार नाहीत.

अमेरिकेतील Google Pay वापरकर्त्यांना कंपनीने Google Wallet ॲपवर जाण्याचा सल्ला दिली आहे. गुगलचे म्हणणे आहे की, ते आपल्या वापरकर्त्यांना वेळोवेळी अपडेट्स देत राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.