शेतकऱ्यांची चिंता वाढली; जनावरांचा चारा महागला..

0

 लोकशाही न्यूज नेटवर्क

वाढत्या महागाईची झळ शेतकऱ्याला देखील बसत आहे. जनावरांना लागणारा चारा आता महागला असून तीव्र टंचाई निर्माण झालीय. जनावरांचा चारा महाग झाल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत.

जनावरांना पोषक चारा म्हणून कडब्याला मागणी असते. कडब्याच्या पैशातून पुढील पिक घेण्यासाठी अर्थिक चलन मिळेल ही आशा शेतकरीवर्ग बाळगून आहे. ज्यांच्याकडे बैलजोडी अथवा गायी, म्हशी आहेत अशा शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांपुरता पेरा केला. तर काही शेतकऱ्यांनी निंदणी, टुपणी, कापणी, लानी, काढणी, कडबा बांधणी या भानगडीत न पडता हरभरा पेरला होता.

त्यामुळे कमी क्षेत्रात दादर असल्याने कडबा भाव खात आहे. सहा हजारांपेक्षा अधिक दराने कडब्याचा चारा विक्री होत आहे. हा दर पशुपालकांना परवडणारा नसल्याने विकणारे कमी आणि घेणारे अधिक असल्याने नाईलाजास्तव कडबा महाग असला तरी तो घेणे भाग पडत आहे.

बैलगाडे, ट्रॅक्टर आदी वाहनांनी हा चारा खळ्यात, गोठ्यापर्यंत नेण्यासाठी लगबग सुरू आहे. तर काही पशुपालक शेतातच कुट्टी करून मिळेल त्या वाहनाने घेऊन जात आहेत. इंधनाचे दर वाढल्याने कुट्टी मशीनवाल्यांनी दर वाढवले आहेत. त्याचाही वेगळा बोझा पडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.