अमित शाह यांचा मोठा निर्णय, देशात लागू होणार CAA

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी CAA लागू करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू करण्याची अधिसूचना जरी केली जाईल आणि हा कायदा लाडू करण्यात येईल असे अमित शाह म्हणाले आहे. त्यांनी मागील वर्षी डिसेंबरमध्ये पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान CAAलागू करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही असा दावा केला आहे.

एएनआयने दिलेल्या रिपोर्टनुसार, अमित शाह यांनी स्पष्ट केलं की सीएए लागू केल्याने कोणत्याही व्यक्तीची नागरिकता काढून घेतली जाणार नाही. याचा उद्देश फक्त धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी, अफगाणीस्तानी आणि बांग्लादेशी अल्पसंख्याकांना नागरिकता देणे हा आहे.

अमित शाह पुढे म्हणाले की, शेजारच्या देशातील पीडित अल्पसंख्याक नागरिकांना नागरीकदा देण्याचे वाचन काँग्रेसने दिले होते. ते म्हणाले की, जेव्हा देशाचे विभाजन झाले तेव्हा तेथे अल्पसंख्यांकांचा छळ केला जात होता. त्यावेळी सर्वांना भारतात पळून यायचे होते, तेव्हा काँग्रेसने तुम्ही या, तुम्हाला नागरिकांत दिली जाईल असे सांगितले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधक मुस्लिमांची दिशाभूल करत असल्याचा आरोप देखील केला. शाह म्हणले की, आपल्या मुस्लिम बांधवांना CAA बद्दल मुस्लिम बांधवाची दिशाभूल केली जात आहे. त्यांना चिथावणी दिली जात आहे. CAA केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने सादर केलेल्या सीएएचे उद्दिष्ट हे 31 डिसेंबर 2014 पूर्वी बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.