खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपी जेरबंद

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमळनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४५/२००८ भादंवि क. ३०२, ३०७,४५२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्हयांत आरोपी वसंत ऊर्फ जयकुमार ढोमन अहिरे (वय ५६ रा. रा. भोईवाडा अमळनेर ता. अमळनेर)  यास मा. अति. सत्र न्यायाधिश अमळनेर जि.जळगाव कोर्टाने जन्मठेप शिक्षा दिल्याने सदर आरोपी हा नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे शिक्षा भोगत असतांना त्यांना दि.०५/०६/२०२२ पावेतो अकस्मीत कोविड १९ अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते.

सदर बंदी कैदी हा मुदतीत कारागृह नाशिक येथे हजर न झाल्याने अमळनेर पो.स्टे.ला गु.र.नं. ३०४/२०२२ भादंवि क. २२४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सदर शिक्षा झालेल्या बंदी फरार आरोपी वसंत ऊर्फ जयकुमार ढोमन अहिरे रा. भोईवाडा अमळनेर ता. अमळनेर हा त्यांचे गावी आल्याची माहिती किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना मिळाल्याने त्यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार पोहेकॉ /संदिप रमेश पाटील, पोना/प्रविण जनार्दन मांडोळे यांना तात्काळ पाठविले असता बंदी फरार आरोपी वसंत ऊर्फ जयकुमार ढोमन अहिरे यांचा अमळनेर शहरात शोध घेतला असता बंदी कैदी हा दि.१२/०७/२०२२ रोजी मिळून आल्याने त्यास वरील गुन्हयांत अमळनेर पो.स्टे. ला पुढील कार्यवाहीसाठी हजर करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.