अल्फा स्पोटर्स फेस्ट २०२३ ला जल्‍लौषात सुरुवात

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील चर्तुर्थ वर्षाच्या संघर्ष टिमतर्फे आयोजित अल्फा स्पोटर्स फेस्ट २०२३ ला सोमवार दि.२० मार्च पासून जल्‍लौषात सुरुवात झाली. आज सकाळी ८ वाजता महाविद्यालयाच्या ग्राऊंडवर गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, मेडिकल कॉलेजचे डिन डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मौसमी लेंढे, उपप्राचार्य विशाखा वाघ प्रा. अश्विनी वैद्य यांच्यासह सर्व विभागप्रमुख शिक्षकवृदांच्या उपस्थीतीत अल्फा स्पोटर्स फेस्ट २०२३ चे उद्घाटन झाले.
याप्रसंगी ध्वजारोहणासह मशाल प्रज्वलीत करण्यात आली. तत्पूर्वी स्पर्धकांनी संपूर्ण परिसरात लाँग मार्च / पथसंचलन करुन वातावरण निर्मिती केली. मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करुन हार्दिक शुभेच्छा दिल्यात. येत्या २७ मार्चपर्यंत हा फेस्ट सुरु असणार आहे. या फेस्टमध्ये विविध क्रिडा स्पर्धा रंग भरण्यासाठी साऊंड सिस्टीमद्वारे समालोचन करण्यात येत असल्याने उपस्थीतांचा आनंद द्विगुणीत होत आहे.

बॉक्स क्रिकेट मॅचेस
गृप ए – बीएससी द्वितीय वर्ष, चतुर्थ वर्ष, प्रथम व जीएनएम प्रथम वर्ष
गृप बी – बीएससी तृतीय वर्ष, एमएससी प्रथम, जीएनएम द्वितीय व तृतीय वर्ष
नॉकआऊट मॅचेस
गृप ए – बीएससी द्वितीय वर्ष विरुद्ध बीएससी प्रथम वर्ष
बीएससी चतुर्थ वर्ष विरुद्ध जीएनएम प्रथम वर्ष
गृप बी – बीएससी तृतीय वर्ष विरुद्ध जीएनएम द्वितीय वर्ष. एमएससी प्रथम वर्ष विरुद्ध जीएनएम तृतीय वर्ष.
सेमीफाईनल्स राऊंड
फर्स्ट सेमीफायनल – फस्ट क्‍वॉलिफाईड ए गृप टिम विरुद्ध सेंकड क्‍वालिफाईड बी गृप टिम
सेकंड सेमीफायनल – सेकंड क्‍वॉलिफाईड ए गृप टिम विरुद्ध फस्ट क्‍वॉलिफाईड बी गृप टिम

अल्फा स्पोटर्स फेस्ट २०२३ चे वेळापत्रक
दिनांक-वेळ-थीम-इव्हेंट्स
२३ मार्च, सकाळी ८ वा. – क्‍लासवाईज टि-शर्ट – थग ऑफ वॉर, लाँग जम्प, रनिंग, ट्रेझर हंट, रिले, शॉट पुट, जावेलिन थ्रो, डिस्क थ्रो, लगोरी
२४ मार्च, सकाळी ८ वा. – ट्विन्स थीम – बॅडमिंटन, चेस, कॅरम, लुडो, क्रश बॉक्स, मिमिक्स
२५ मार्च सायंकाळी ५.३० वा – वेस्टर्न – डिस्को दिवस
२६ मार्च, सायंकाळी ६ वा. – वेस्टर्न – डिनर नाईट विथ रील्स शो
२७ मार्च सायंकाळी ५.३० वा- बॉलीवुड – अरींडॅम फ्रेशर्स पार्टी विथ अ‍ॅन्युअल गॅदरिंग

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.