मुंबई रेल्वे साखळी स्फोटाच्या मास्टरमाईंड आजम चीमाचा मृत्यू

0

 

नवी दिल्ली : मुंबईत २००६ मध्ये झालेल्या रेल्वेतील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आजम चीमाचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला. ७० वर्षीय चीमाचे फैसलाबादमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सूत्रांनी सांगितले. चीमा हा कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या गोपनीय विभागाचा प्रमुख होता. मुंबईत ११ जुलै २००६ रोजी रेल्वेच्या सात डब्यांत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात १८९ प्रवाशांचा मृत्यू झाला
होता, तर ८२४ जण जखमी झाले होते- या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हा चीमा होता. याशिवाय मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातदेखील त्याचा हात होता. २००८ च्या मुंबईवर १० दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १६६ जण मृत्युमुखी पडले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.