भारतीय सैन्यात अग्निवीर भरतीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

भारतीय लष्करात भरती होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्करातर्फे अग्निवीरांच्या पुढील भरतीची नोंदणी प्रक्रिया आज, ८ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट www.joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

या तारखेपर्यंत आहे अर्ज करण्याची मुदत

भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखेपर्यंत अर्ज करावा.

वयोमर्यादा

या भरती प्रक्रीयेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 17 ते 21 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

अर्ज फी

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 550 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे जे ऑनलाइन माध्यमातून जमा कर्ता येईल.

निवड प्रक्रिया

भरती परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार शारीरिक चाचणीत बसतील. त्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया होईल. त्यानंतर पुन्हा मेडिकल होईल. या सर्व टप्प्यातील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

अर्ज कसा करायचा

  • सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्याच्या होम पेजवर, JCO/OR/Agniveer Apply च्या लिंकवर क्लिक करा किंवा JCO/OR/Agniveer Enrolment या विभागात लॉगिन करा.
  • त्यानंतर अग्निवीर लॉगिन पेज उघडेल.
  • यानंतर नोंदणी लिंकवर क्लिक करा.
  • आता फॉर्म भरण्याची पुढील प्रक्रिया सुरू करा.
  • शेवटी फी ऑनलाइन भरा आणि फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट करा.

Leave A Reply

Your email address will not be published.