नेटकऱ्यांची ‘आदिपुरुषवर’ टीका, तरीही एका दिवसात कमविले ‘इतके’ कोटी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन एक दिवस उलटला आहे. पहिल्या दिवशी सिनेमावर भरपूर प्रमाणात टीकाही झाली पण, सिनेमाच्या कमाईत फार जास्त त्याचा परिणाम जाणवला नसल्याचे लक्षात आले आहे. उलट सिनेमाने दणदणीत कमाई केली आहे. हा सिनेमा हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, आणि मल्ल्याळम अशा पाच भाषेत प्रदर्शित केला गेला आहे. तब्बल ६,२०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता. फक्त हिंदीतच हा सिनेमा ४,००० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला होता.

आदिपुरुषचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
सूत्रानुसार आदिपुरुषाने रिलीजच्याच्या पहिल्याच दिवशी ८६. ५० कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने १५० कोटींचा टप्पा पार केला आहे. फक्त हिंदीमध्ये या सिनेमाने ४५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तसे पाहिले हा सिनेमा बिग बजेट आहे. या सिनेमात रामाच्या मुख्य भूमिकेत प्रभास (Prabhas), सीता मातेच्या भूमिकेत क्रिती सेनन (Kriti Sanon), रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान (Saif Ali Khan), लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंह (Sunny Singh) तर हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे (Devdutt Nage) अशी तगडी स्टारकास्ट आहे. असेच अजून बऱ्याच मराठी कलाकारांची सुद्धा या चित्रपटात वर्णी लागलेली दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.