अरे बापरे : दशमाता मंदिरात चोरट्यांचा डल्ला ;देवीच्या आभूषणासह दानपेटीतील ३ लाखांचा ऐवज लांबविला

0

पद्मालय रोडवरील नागदुली शिवारातील घटना ; परिसरात खळबळ

एरंडोल ;--दशमाता मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या भिंतीचा विटांचा चौरस कोरून चोरटयांनी आत प्रवेश करून दशमाता देवीच्या अंगावरील सोन्या चांदीचे आभूषणे , दानपेटीतील रक्कम असा ऐकवून ३ लाख रुपयांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार १६ रोजी सकाळी उघडकीस आला . यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान चोरटयांनी मंदिरातील देवीदेवतांची आभूषणे आणि दानपेटी चोरण्याचा प्रकार अलीकडे वाढला असल्याचे लक्षात येत आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन पाहणी केली.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , पद्मालय रोडवरील बारा ज्योतिर्लिंग महादेवाच्या बाजूला असलेले दशमाता मंदिराच्या मागच्या भिंतीच्या विटांचा चौरस करून मंदिरात प्रवेश करीत मंदिरातील लोखंडी कपाटातील १५ हजारांची रोकड, १०० रुपये दराच्या ३०० नोटा असा एकूण ३० हजारांची रोकड , देवीच्या कानातील ५ ग्राम वजनाचे कानातील सोन्याचे टोंगल १५ हजार रुपयांचे, देवीचे चांदीचे आभूषणे ५० पाळणे ,प्रत्येकी ३ भार एकूण दीड किलो वजनाचे ४५००० हजार रुपयांचे, देवीच्या चांदीच्या मूर्ती ४ अंदाजे प्रत्येकी १० भार , असे एकूण ४० बार अंदाजे १२ हजार रुपये, मंदिरात ठेवलेल्या दानपेटीमधून एका पेटीतील मोजून ठेवलेले ३१ हजर रुपये, व दोन दंपतींमधी १२ हजार असे एकूण ४३००० रुपये असा सर्व एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला . याबाबत नागदुली येथे राहणारे पुजारी विलास मंगल महाजन वय ३३ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.