आडगाव येथे महावितरणची 70 वीजचोरांवर धडक कारवाई

0

कासोदा ता, एरंडोल , लोकशाही न्यूज नेटवर्क

महावितरणच्या कासोदा कक्षांतर्गत आडगाव येथे महावितरणच्या एरंडोल उपविभागातर्फे गुरुवारी (9 मार्च) वीजचोरांवर धडक कारवाई करण्यात आली. यात 70 जणांनी वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आडगावमध्ये रोहित्र जळणे, त्याचप्रमाणे वारंवार विद्युतपुरवठा खंडित होणे या अनुषंगाने कासोदा उपकेंद्र येथे ग्राहकांच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. तसेच सदर फिडरच्या वीजगळतीमध्येही जास्त वाढ झालेली होती. त्या अनुषंगाने एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली एरंडोल उपविभागातील सर्व अभियंते व कर्मचारी यांना सोबत घेऊन तीन वेगवेगळ्या पथकांद्वारे आडगाव गावातील एकूण 215 घरगुती व वाणिज्य या ग्राहकांची वीजजोडणी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मीटरमध्ये विविध प्रकारच्या अनियमितता आढळून आल्या. मीटरमध्ये छेडछाड करणे, अनधिकृत वीजपुरवठा घेणे, घरगुती मीटर वीजजोडणी असतांना व्यवसायिक वीजजोडणीसाठी अनधिकृतपणे वीजपुरवठा वापरणे आदी प्रकारे वीजचोरी आढळून आली. सदर वीजचोरीची कार्यवाही करताना कासोदा पोलीस स्टेशनमार्फत योग्य ते पोलिस संरक्षण घेण्यात आलेले होते. या मोहीम मध्ये कासोदा कक्षाचे सहाय्यक अभियंता राहुल पाटील, एरंडोल शहर कक्षाचे सहाय्यक अभियंता पी एस महाजन , एरंडोल उपविभागातील गुणवत्ता नियंत्रक सहाय्यक अभियंता श्री जयदिपसिंग पाटील, सहाय्यक लेखपाल मनोहर पाटील, उच्चस्तर लिपिक बारेला, शिपाई श्रीमती देवरे , रिंगणगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता युवराज तायडे, एरंडोल ग्रामीण कक्षाच्या सहाय्यक अभियंता लक्ष्मी माने व उत्राण कक्षाचे कनिष्ठ अभियंता इच्छानंद पाटील तसेच कासोदा कक्षातील सर्व जनमित्र व उर्वरित कक्षामधील प्रत्येकी पाच जनमित्र, बाह्यस्त्रोत कर्मचारी यांनी सदर मोहीम मध्ये सहभाग नोंदवून ही मोहिम यशस्वीपणे पार पडली. ही मोहीम राबवितांना कार्यकारी अभियंता धरणगाव रमेश पवार साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.