प्रा.विजय लोहार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

0

जळगाव ;- मूळजी जेठा महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्राध्यापक असलेले प्रा.विजय लोहार यांना शिक्षक दिनानिमित्त नुकताच पुनतगाव, नेवासा येथील शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचा महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.

शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा प्रत्येक वर्षी महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मान करण्यात येत असतो. नेवासा फाटा येथे आयोजित कार्यक्रमात माजी कुलगुरू डॉ.अशोक ढगे, श्रीराम साधना आश्रम, रामनगरचे महंत सुनिल जी महाराज व शिवस्वराज्य संस्थेचे अध्यक्ष संजय वाघमारे यांच्या हस्ते प्रा.विजय लोहार यांना हा पुरस्कार देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.