एरंडोलजवळ अपघात; २ युवक जागीच ठार

0

लोकशाही न्युज नेटवर्क
एरंडोल – जळगावकडून एरंडोलकडे भरधाव वेगाने जाणारी कार व दुचाकी यांचा अपघात होऊन २ जण जागीच ठार झाले तर १ युवक गंभीर जखमी झाला आहे.
ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पिंपळकोठा गावापासुन थोड्या अंतरावर सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
एम.एच.१५ एच.वाय ०७०० ही मर्सिडीज गाडी जळगाव कडून नाशिककडे भरधाव वेगाने जात होती. या गाडीने नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीस धडक दिल्याने त्यात नितिन जामसिंग पाटील वय-२१वर्षे व घनश्याम भानुदास बडगुजर वय-२०वर्षे हे दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच गतप्राण झाले. याशिवाय ज्ञानेश्वर गणसिंग पाटील वय २२वर्षे हा पादचारी युवक गंभीर जखमी झाला.
यावेळी माजी जि.प.सदस्य नानाभाऊ पोपट महाजन, अशोक पाटील, राजेंद्र पाटील, मनोज पाटील, हरीभाऊ महाजन, अशोक बडगुजर व इतर ग्रामस्थांनी मदतकार्य केले. ज्ञानेश्वर पाटील या युवकास पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. विशेष हे की, ज्ञानेश्वर पाटील हा २१जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार होता.

Leave A Reply

Your email address will not be published.