ब्रेकिंग; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अपघात !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

देशातील धडाकेबाज महिला नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीचा आज अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारविरोधात ते झुंज देण्यासाठी रणनीती आखत आहेत. यासाठी त्या इंडिया आघाडीसोबतही जाण्यास तयार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारविरोधात ते झुंज देण्यासाठी रणनीती आखत आहेत. यासाठी त्या इंडिया आघाडीसोबतही जाण्यास तयार आहेत.पण, अशातच आज एक अनपेक्षित घटना घडली. ममता बॅनर्जी यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या वर्षमान येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतची बैठक पार पडल्यानंतर ममता कोलकाताकडे रवाना झाल्या. त्यावेळी कारचा अचानक ब्रेक लागल्याने ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना SSKM रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. ममता यांना किरकोळ जखम झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

वर्षमानमध्ये बैठकीमध्ये ममता बॅनर्जी या एका सार्वजनिक कार्यक्रमातही सहभागी होणार होत्या. तिथून त्या हेलिकॉप्टरने राजधानी कोलकाताला परतणार होत्या. पण वातावरण खराब असल्याने त्यांना हेलिकॉप्टरने न घेऊन जात रस्ते मार्गाने कोलकाताला घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांचा ताफा कोलकाताच्या दिशेला वेगाने पुढे जात होता. याच दरम्यान अपघाताची घटना घडली.

Leave A Reply

Your email address will not be published.