जळगावात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवार 14 एप्रिल 2023 रोजी जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे जळगांव रेल्वे स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मल्ल्यार्पण करून यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी मनपा महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड , अतिरिक्त आयुक्त .चंद्रकांत वानखेडे सहा. संचालक के पी बागुल महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा मा.प्रतिभाताई शिंदे,यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त अभिजीत बाविस्कर, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे सो., आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील .,कार्यालय अधिक्षक अविनाश बाविस्कर यांनी सुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांच्या समवेत शाखा अभियंता.मनीष अमृतकर, प्रभाग अधिकारी नरेंद्र चौधरी, प्रकाश सोनवणे, समाजसेवक श्री.हरिश्चंद्र सोनवणे तसेच मनपा.अधिकारी/ कर्मचारी यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.