जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
आधार जेष्ठ नागरिक संघाची सभा SMIT महाविद्यालयात पार पडली. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष डॉ. संभाजी देसाई, अमृत पाटील, प्रा.सुनील गरुड, सौ.शांताताई वाणी, नगरसेवक गजानन देशमुख यांची प्रमुख उपस्थित होती.
प्रास्ताविकेत अध्यक्ष डॉ.संभाजी देसाई यांनी बांधकाम निधी विषयी माहिती देऊन हे सर्वांच्या सहकार्याने शक्य झाले, असे सांगत जेष्ठांना मार्गदर्शन केले. प्रा.सुनील गरुड यांनी ज्येष्ठांना नेहमी आनंदी राहण्याचा सल्ला दिला. गजानन देशमुख यांनी संघांच्या उभारणी पासून सखोल अनुभव सांगितला. सौ.शांताताई वाणी यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या जुलै महिन्यातील १० सदस्यांचा वाढदिवस पुष्पगुच्छ टॉवेल देऊन सत्कार करण्यात आले. कवी प्रकाश पाटील यांचाही डॉ.संभाजी देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अमृत पाटील, सौ.शांताताई वाणी, गजानन देशमुख, प्रा.सुनील गरुड, पंढरीनाथ साळुंखे, मोहन खैरनार, विकास पवार, बळवंतराव चव्हाण, संतोष गावंडे, डी. डी.पाटील, अनंतराव मगरे, नामदेव पाटील, अनंतराव मोरे तसेच अनेक सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी कवी प्रकाश पाटील यांनी “मंद मंद वारा” कविता सादर केली. आणि चहापानाने सभेची सांगता झाली.