मराठी आणि बोली भाषाचे अस्तित्वच धोक्यात

0

जामनेर दि . 30 –
लोकशाहीन आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे.प्रत्येकाला आपल्या व अन्य कोणत्याही भाषेत बोलण्याचा आणि विचार मांडण्याचा हक्क आहे.महाराष्ट्रात इंग्रजीला असलेल्या अतिरिक्त महत्वामुळे मराठी आणि तिच्या अस्तित्व धोक्यात आलेलं असल्याचे प्रतिपादन जेष्ठ संपादक, साहित्यिक गो. तु. पाटील यांनी केले.
जामनेर येथे एकलव्य शाळेत आयोजित पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर उदघाटक पद्मश्री ना.धो.महानोर, प्रा. डॉ. किसनराव पाटील, अशोक कोतवाल, जे.के चव्हाण, दिपक पाटील, मधु पांढरे, सपकाळे, पाटील, सुशील पगारेया, डी.डी पाटील, शाशिकांत इंगोनेकर आदी होते.यावेळी तावडी माती, ग्रंथवेळ्या लहरी,पंचायत यासारख्या विविध पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
आपण दिलेल्या अध्यक्ष हा सन्मान माझा नसून माझ्या माय बोलीचा आहे.मराठी ही मुख्यतः महाराष्ट्राची भाषा आहे,कालांतराने तिचे बोली म्हणून अस्तित्व नाहीस होईल, अशी वाटावी, अशी परिस्तिथी आज आहे. आयुष्यात भरपूर काही मिळवले पण माझी माय बोली, माझे गाव आणि माझे माणसे त्यांच्या आठवणी कधी गेल्या नाही. जामनेरात गोविंद महाराजांचे पावित्र्य या गावात आजही आहे, त्यानिमित्ताने रथही जामनेर ला काढला जातो. शिक्षणाच्या बाबतीत जामनेर गावाचा अभिमान वाटतो परीक्षकांन तर्फे हे कॉपी मुक्त शेंगोडा हे गाव जामनेर जवडील हिंदू ऐकते चे प्रतीक आहे. जाळगावला स्वर्ण नागरी म्हणून ओळखले जाते पण त्स्वर्ण नगरीची पाया भरणी जामनेर ने केली आहे. आपल्या माय बोलीचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी कितीही मोठे झाले तरी आपली माय बोली कधी विसरू नका. शालेय पातळीवर आणि महाविद्यालय मराठी हा विषय सक्तीचा झाला पाहिजे त्यासाठी झाले पाहिजे.महाराष्ट्र अनेक बोली भाष्या आहे, त्यातील खान्देशात मुख्यतः तावडी आणि खान्देशी बोली भाषा आहे.बहिणाबाईचे वास्तव्य देखील तावडी मधील आहे, त्यांच्या बर्‍याच कविता तावडी भाषेतील आहे. आपल्या कडील श्रीयांनी देखील पुढे यावे आणि लेखन करावे, त्या लिहत्या झाल्या पाहिजे असे मत केले.
ना.गिरीश महाजन यांनी दिल्या फोनवरून शुभेच्छा – फोन ऑन करून माईकला लावून मंत्री महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली. खुप इच्छा असूनही कार्यवेस्थते मुळे मी कार्यक्रमाला येऊ शकलो नाही. मनस्वी दुःख होत आहे की मला कार्यक्रमाला हजर राहता आले नाही.तावडी बोली साहित्य संमेलनातून आपल्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळाली सर्व साहित्याकांचे मानापासून स्वागत या निमित्ताने तावडी बोलीला चांगले मिळणार आहे. दरवर्षी अशी अपेक्षा या वेळी मंत्री महाजन यांनी व्यक्त केली.
पदमश्री ना.धो. महानोर:-जामनेर तालुक्यातील शेंदुरणीने मला सर्व काही दिले आहे,मी याच मातीतुन मोठा झालो आहे .मी आधी शेतकरी आहे नंतर कवी आहे. शेतकरी समाज आपल्या कडे जास्त आहे, त्यांच्या देखील व्याथा कवींनी मळल्या पाहिजे. माणसाला पकडून ठेवण्याची साहित्यात आहे. खार्‍यासाठी रडणारे जामनेर चे लोक आहे.जामनेर ही
काव्याची जननी आहे, नंतर सोन्या-चांदीची.नदी जशी प्रवाहात येते तशे कवी प्रवाहात येत असतात.प्रत्येक वेडेल कविता नवीन काही शिकवत असतात त्यासाठी आपण देखील आपल्या मायबोली तील कवितांचा अभ्यास केला पाहिजे. कसं जगावं, कश्यासाठी जगावं हे साहित्यिक कवितांतून शिकवत असतात. पुस्तक आणि नसते तर जगात काहीच नसते. सर्व काही पुस्तकाने आम्हाला दिलं आहे,परंतु त्याचा विसर पळुदेऊ नका.वाचन संस्कृती आपल्या घरात, गावात आपण पेरली पाहिजे.
यावेळी किसन पाटील व अशोक कोतवाल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरवात सकाळी वाजता नगर पालिका चौक ते एकलव्य शाळे पर्यंत ग्रंथ दिंडी कडून करण्यात तसेच दिवसभरात लोककला, कथाकथन, कविसंमेलन इत्यादी कार्येक्रम घेण्यात आले.
प्रास्ताविक अशोक कोळी तर सुत्र संचालन गणेश राऊत व स्वाती विसपुते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साठी तालुकाभरातील साहित्यिक,कवी तशेच शिक्षक रुंद संपूर्ण जामनेर वाशीयांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.