अमरावती येथे दुसऱ्या लसीच्या डोजसाठी नागरिकांची गर्दी ; सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

0

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने . नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जागरूकता निर्माण झाली आहे. पहिली लस घेतल्यानंतर दुसऱ्या लसि करीता पात्र असलेले नागरिक लसींची प्रतीक्षा करीत होते. मात्र सहा मे पासून पुन्हा लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी लसीकरन केंद्र सुरू झाल्याने . नागरिकांची सर्वच केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे . अनेक केंद्रावर सोशल डिस्टन्स सिंगचा फज्जा उडालेला दिसत आहे.

अमरावती जिल्ह्यासाठी बुधवारी कोविशील्ड व कोव्हॅक्सिन अशा दोन्ही मिळून 27 हजार 900 कोविड प्रतिबंधक लस प्राप्त झाले आहेत. यानंतर सहा मे पासून अमरावती जिल्ह्यातील अनेक केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली. यात दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी शहरातील दंत महाविद्यालय, महेंद्र कॉलनी, भाजीबाजार, श्री वल्लभ तखतमल हॉस्पिटल , नागपुरी गेट, व बडनेरा येथील मोदी हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय समोरील केंद्र दस्तुर नगर येथील केंद्राचा समावेश आहे. याशिवाय प्रथम लस घेणाऱ्यांसाठी देखील शहरात तीन व ग्रामीण भागात 12 केंद्रे उघडण्यात आली होती . पहिल्यांदा लसी करीता नागरिकांची गर्दी झाली असली तरी .दुसऱ्या लसीसाठी पात्र असणार्‍यांची  केंद्रावर मात्र झुंबड उडतांना दिसत आहे . शहरातील अनेक केंद्रावर टोकन देण्यात येत आहे. टोकण प्राप्त करण्यासाठी केंद्राबाहेर सकाळी सहा वाजता पासूनच लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या . श्री वल्लभ तखतमल हॉस्पिटल राजापेठ येथील केंद्रावर शुक्रवारी लांबच लांब रांग लागलेली होती .परंतु रांगेतील नंबर प्रमाणे नागरिकांना टोकण वाटप न करता. केंद्रावरील  कर्मचाऱ्यांच्या  ओळखीच्या व पैसे देणाऱ्या लोकांना टोकन मिळत असल्याच्या तक्रारी येथे नागरीकांनि येथे सदर प्रतिनिधिजवळ केल्या.  अशीच परिस्थिती आणखी काही केंद्रावर सुद्धा दिसून आली .त्यामुळे रांगेत ताटकळत उभे राहणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला  होता.

गेल्या आठवड्यात कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नव्हत्या त्यामुळे अनेक केंद्र बंद करण्यात आली होती. शासनाच्या निर्देशानुसार केवळ 18 ते 44 वयोगटाच्या व्यक्तींना लसीकरण करण्यात येत असल्याने दुसऱ्या लसीसाठी  पात्र असणार्‍यांचा भ्रमनिरास झाला होता . मात्र बुधवारी जिल्ह्यात लसी प्राप्त होताच . गुरुवार पासून दुसरी लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. 45 वयोगटातील व्यक्तींची लसीकरण केंद्रावर गर्दी होत असून . सामाजिक अंतराला खो देण्यात आल्याचे चित्र आहे .मे महिन्यात उन्हाचा कडाका वाढला असून . लसीकरण केंद्राबाहेर रांगेत उभ्या असणार्‍या अनेकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे . दुसरा डोज घेणाऱ्यांमध्ये 45 वर्षे व वृद्धांची संख्या अधिक असल्याने .अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.