Jio च्या ग्राहकांसाठी खुशखबर ; ३३० रुपयांमध्ये ३ महिने अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा

0

मुंबई : अनेक ग्राहकांना डाटा वापरण्यापेक्षा कॉलिंग अधिक करत असतात. अशा ग्राहकांसाठी अधिक वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ देणारे खास प्लॅन्स जिओने आणले आहे. जिओच्या ३२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

ग्राहकांना ३२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांचा कालावधी मिळतो. हा प्लॅन डाटापेक्षा कॉलिंगचा अधिक वापर करणाऱ्यांसाठी फायद्याचा आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

या प्लॅनमध्ये १००० एसएमएस देखील मिळतात. प्लॅनच्या कालावधीमध्ये कधीही याचा वापर करता येईल. याशिवाय यूजर्सला ६ जीबी डाटा यात मिळतो. सोबतच, जिओ अ‍ॅप्सच्या मोफत स्बस्क्रिप्शनचा देखील लाभ मिळतो. याच किंमतीच्या जवळपास व्हीआय आणि एअरटेल देखील असेच प्लॅन्स ऑफर करत आहे, त्याविषयी जाणून घेऊ.

Vi चा ३७९ रुपयांचा प्लॅन

व्हीआयच्या या प्लॅनमधील बेनिफिट्स रिलायन्सच्या प्लॅनप्रमाणेच आहेत. यात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, १००० एसएमएस आणि ६ जीबी डाटा मिळतो. याशिवाय Vi Movies & TV Basic अ‍ॅपचे स्बस्क्रिप्शन दिले जात आहे. या प्लॅनचा कालावधी८४ दिवसांचा आहे.

एअरटेलचा ३७९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, ९०० एसएमएस आणि ६ जीबी डाटा दिला जात आहे. याचा वापर प्लॅनच्या पूर्ण कालावधीमध्ये कधीही करता येईल.

यासोबतच Airtel Xstream Premium अ‍ॅपचे मोफत स्बस्क्रिप्शन या प्लॅनमध्ये दिले जात आहे. तसेच, Prime Video च्या Mobile Edition चे मोफत ट्रायल, फ्री हेलोट्यून, विंक म्यूजिक, अपोलो अ‍ॅपचे स्बस्क्रिप्शन देखील मिळेल. या प्लॅनची वैधता ८४ दिवस आहे.तुम्हाला जर जिओच्या ३२९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत दुसरा प्लॅन शोधत असाल, तर तुम्ही १२९ रुपयांच्या प्लॅनचे रिचार्ज करु शकता.

जिओचा १२९ रुपयांचा प्लॅन

या प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय ३०० एसएमएस व पूर्ण कालावधीसाठी २ जीबी डेटा देखील मिळेल. सोबतच, जिओ अ‍ॅप्सच्या मोफत स्बस्क्रिप्शनचा फायदा घेता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.