आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले ; जाणून घ्या नवे दर

0

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सलग दुसर्या दिवशी  पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. आज पेट्रोल १९ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले आहे. यापूर्वी मंगळवारी १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती.

आजच्या दरवाढीने मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९७.१२ रुपये झाला आहे. तर दिल्लीत पेट्रोल ९०.७४ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.७० रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९०.९२ रुपये झाला आहे.

पेट्रोलप्रमाणेच आज डिझेलच्या दरात देखील सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ८८.१९ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८१.१२ रुपये झाला आहे. चेन्नईत डिझेल ८६.०९ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८३.९८ रुपये प्रती लीटर झाले आहे.

निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा २६ फेब्रुवारी रोजी केली होती. त्यानंतर पेट्रोलियम कंपनहानी २७ फेब्रुवारी २०२१ रोजी डिझेल दरात १७ पैशांची वाढ केली होती. त्यानंतर दरवाढ झाली नाही. तर मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात डिझेल दरात चार वेळा कपात झाली. यात डिझेल ७४ पैशांनी स्वस्त झाले होते.

सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.