दिलासादायक : जिल्ह्यात नव्या बाधितांची संख्या आठशेच्या टप्प्यात

0

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती सकारात्मकपणे बदल आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर आहे. आज पुन्हा जिल्ह्यात नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज मंगळवारी ८०८ रुग्ण आढळून आले आहे. तर आजच १०७६ कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहे. मात्र जिल्ह्यात मृत्यूचे सत्र कायम आहे. आज १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या रुग्ण संख्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख २५ हजार ४५४ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख १३ हजार ४३२ जण बरे होऊन घरी गेले आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत २२५४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट या लाटेत प्रथमच ९०.४२ टक्क्यांवर पोचला आहे.

आजची आकडेवारी

आज जळगाव शहर-१५३, जळगाव ग्रामीण- ३१, भुसावळ-१३३, अमळनेर-२७, चोपडा-२९, पाचोरा- १६, भडगाव-१७, धरणगाव-०९, यावल-२५, एरंडोल-१९, जामनेर-३८, रावेर-७८, पारोळा-३२, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-७८, बोदवड-४६ आणि इतर जिल्ह्यातील ०८ असे एकुण ८०८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.