पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल दरात वाढ; तपासा आजचे दर

0

मुंबई: पाच राज्यांमधील निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारने अपेक्षेप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. त्यामुळे आज मंगळवारी पेट्रोल 15 पैसे तर डिझेल 18 पैशांनी महागले. तब्बल 66 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोलडिझेलच्या किंमतीत ही वाढ जवळपास दोन महिन्यांनी झाली आहे. या आआधी 27 फेब्रुवारीला पेट्रोलच्या दरात 24 पैसे तर डिझेलच्या दरात 17 पैशांची वाढ झाली होती. आता दोन महिन्यांनी पुन्हा पेट्रोलच्या किंमतीत आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?

जळगाव : पेट्रोल- 37.16, डिझेल 86.86

मुंबई: पेट्रोल- 96.95, डिझेल 87.98

पुणे: पेट्रोल- 96.60, डिझेल 86.30

नाशिक: पेट्रोल- 97.36, डिझेल 87.04

औरंगाबाद: पेट्रोल- 98.19, डिझेल 89.22

दिल्लीमध्ये 15 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 18 पैसे प्रती लीटर वाढ झाली आहे. मंगळवारी दिल्लीच्या बाजारात पेट्रोलचा दर 90.55 रुपये तर डिझेलचा दर 80.91 रुपये झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.