धानो-यासह परिसरात पाच रूपयाची नोट बाद झाल्याची अफवा?

0

धानोरा (विलास सोनवणे) : ग्रामिण भागाती चोपडा तालुक्याती  धानोरा येथे  सध्या सर्वत्र पाच रुपयाच्या नोटेबद्दल अफवा पसरल्या असून चलनातून बाद झाले असल्याने ते कुणी स्वीकारत नाही आहे. पाच रुपयांचे नोट हे चलनातून बाद झाले नसून ही निव्वळ अफवा आहे. बाजार, मार्केट, हॉटेल,पानटपरीवाले,किराणा दुकान, कुठेही सामान खरेदी करतांना असो वा तुम्ही पाणीपुरी वाल्याजवळ पाणीपुरी खात असले तरी तो पाच रुपयांचे नोट स्वीकारत नाही. सध्या धानोरा सह परिसरात  सर्वत्र ही परिस्थिती दिसून येत आहे.

याबाबत अनेक दुकानदार, व्यावसायिकांना विचारले असता कुणीच आमच्याकडून हे नोट घेत नाहीत त्यामुळे आम्ही पण स्वीकारत नाही असे समजले. मात्र खरी बाब ही की,पाच रुपयांची नोटे हे चलनातून बाद झाले नसून ही निव्वळ अफवा आहे. ५० पैसे, ५ रु. ची नोट आणि  हे बाद झालेले नसून एसटी, बँक तसेच अनेक ठिकाणी स्वीकारल्या जात आहेत. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया ने जाहीर आवाहन केललेे आहे की, ५० पैसे, ५ रु. ची नोट आणि १० रुपयांचे नाणे चलनातून बाद केली नाहीत. आणि त्यामुळे पाच रूपयाची नोट व ५० पैसे स्वीकारणे हे कायद्याने कलम १२४ (अ) भादंवि नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात आलेले असुन सुद्धा ग्रामिण भागात अशी अफवा पसरली आहे  की, ५० पैसे, पाच रुपयाची ची नोट व्यवहारात स्वीकारावेत. तसेच यासंबंधी इतर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये

लोकांच्या मनात अशी कोणतीही  अफवा किवा पाच रूपयाच्या नोटे   बद्दल असेल तर ती भ्रमिक आहे. पाच रूपयाची नोटे बंद झालेली नाही. व रिझर्व बँकेकडुन कोणतीच नोट बाद झालेली नाही जर झालेली असती तर आम्हाला सुचित केले जाते . परतु कोणाचेया हि सांगण्यावर भरोसा करू नये
संदीप यादव
सेट्रल बँक आँफ इडियां धानोरा बाँक मँनेजर

 अशा कोणत्याही अफवा  वरती विश्वास ठेऊ नये. कोणताही दुकानदार पाच रूपयाची नोटे घेत नसेल तर कायदेशीर गन्हा दखल होऊ शकतो
– किरण दाडंगे
आडावद पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक 

Leave A Reply

Your email address will not be published.