वाघळुद फाट्यावर ट्रक व मोटरसायकलच्या अपघातात पिताचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर

0

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील यावल भुसावळ मार्गावरील वाघळुद फाट्यावर मोटरसायकल व ट्रकच्या झालेल्या  भिषण अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की दिनांक २१ एप्रिल रोजी दुपारी वाजेच्या सुमारास कडुन येणाऱ्या मोटरसायकल दुचाकी वाहनाने सुरेश सोनवणे वय ४५वर्ष राहणार आव्हाणे ता. जि.जळगाव व त्यांची मुलगी मनिषा सुरेश सोनवणे वय१९ वर्ष हे दोघ म्हैसवाडी कडुन बोरावल मार्ग जात असतांना भुसावळ कडुन यावल कडे येणाऱ्या ट्रक क्रमांक जि जे २७ टीटी४३७८या चारचाकी मोटर वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघात सुरेश सोनवणे हे जागीच मरण पावले असुन त्यांची मुलगी मनिषा सोनवणे ही गंभीर जखमी झाली.

त्याच वेळी अंजाळे येथील राहणारे धनराज शांताराम सपकाळे व सागर निवृती तायडे यांनी घटनास्थळी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तरूणीची तात्काळ मदत करून ग्रामीण रुग्णालयात पहोचवले तिचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात औषधपचार करण्यात येवुन तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठवण्यात आले आहे . मयत सुरेश सपकाळे यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण  रुग्णालयात आणले आहे .पोलीसांनी अपघातास कारणीभुत असलेल्या ट्रकला व वाहनचालकास ताब्यात घेतले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.