अहमदपूर शहरात ट्रॅक्टरद्वारे मुफत पाणी वाटप

0

अहमदपूर/प्रतिनिधी : सध्या उन्हाळ्याची उन्हाची तीव्रता वाढली असून शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे . या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते , युवा नेते अॅड . निखिल कासनाळे यांच्या वतीने संपूर्ण उन्हाळ्यात टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

याचा शुभारंभ बुधवारी ( दि .३ ) शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये विद्यानगर येथे त्यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक चोले मामा , गोविंद भुरे , गणेश चौधरी , ढाकणे सर , बालाजी वट्टमवार , पोले सर , शंकर चोले , नितीन हामणे , अनिल बोडगे , गोपाळ काळे , निलेश ढाकणे , सोहेल काझी आदींची उपस्थिती होती .

Leave A Reply

Your email address will not be published.