लोकशाही दिनदर्शिका२०२१ चे दिमाखात प्रकाशन

0

कुलगुरू,आयुक्त आणि अधिष्ठाता यांची उपस्थिती

जळगाव – लोकशाही समुह इथिकल पत्रकारिता करत लोकशाहीतील चौथ्या खांबाचे पावित्र्य जपत उज्वल ते कडे मार्गक्रमण करीत आहे हे अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार जळगाव शहर मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी काढले

लोकशाही वृत्तपत्र समूहातर्फे निर्मित दिनदर्शिका २०२१ चा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात आज जळगावी लोक लाईव्ह च्या स्टुडिओमध्ये करण्यात आले. यावेळी आयुक्त कुलकर्णी बोलत होते.

प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश आणि बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू पी पी पाटील आणि आसिफ मेमन उपस्थित होते.

लोकमनाचं खरं प्रतिबिंब लोकशाहीच्या माध्यमातून प्रसारित होत आहे,
लोकशाही समृद्ध करण्यासाठी प्रत्येक स्तंभाच अनन्य साधारण महत्त्व आहे. एका स्तंभाने उर्वरित सर्व स्तंभांवर अंकुश ठेवण्याचा आणि त्याला दिशा दाखवण्याचा कार्य हे फार महत्त्वाचं असतं. संपूर्ण समाज आणि प्रशासन हे दैनिक लोकशाही सारख्या वृत्तपत्रांकडे मार्गदर्शकाच्या भूमिकेतून पाहत असतं.
लोकमनाचं प्रतिबिंब हे वृत्तपत्रांमधून उमटले पाहिजे, दैनिक लोकशाही सारख्या वृत्तपत्रांतून ते उमटतं.
असेही मनोगत कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद बोलताना म्हणाले, वृत्तपत्र हा एक समाजाचा आरसा आहे लोकशाही ची भूमिका ही प्रथमपासून तशाच पद्धतीची राहिली आहे लोकशाही तर्फे प्रसारित करण्यात आलेले कॅलेंडर हे देखील येणाऱ्या वर्षभरात एक सकारात्मक ऊर्जा देईल, अशा पद्धतीचा विश्वास लोकशाहीच्या दिनदर्शिका मधून येत असल्याचे मत अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांनी यावेळी काढले.

कुलगुरू डॉक्टर पी पाटील यांनी लोकशाहीच्या संपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला आणि आस्थे पूर्वक माहिती जाणून घेतली आणि संपूर्ण लोकशाहीच्या सर्व टीमचे कौतुक केले.

प्रसंगी आसिफ भाई मेमन यांचे समायोचीत मनोगत झाले.
सुरुवातीला राजेश यावलकर यांनी प्रास्ताविक केले, तर मान्यवरांचे महाव्यवस्थापक सुभाष गोळेसर व्यवस्थापक विवेक कुलकर्णी आणि अनिकेत पाटील यांनी पुष्प देऊन स्वागत केले.

लोकशाही दिनदर्शिका २०२१ चे मान्यवरांच्या हस्ते फीत सोडून प्रकाशन करण्यात आले.
आभार शुभांगी यावलकर यांनी मानले तर संचलन पीआरओ मानसी भावसार यांनी केले. प्रकाशन सोहळा यशस्वीतेसाठी मोहन पाटील, नितीन नेमाडे, ललित कोळी, विमल कोळी आणि गौरव वाणी यांनी परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.