कोरोनामुळे भुसावळ येथील सहाय्यक फौजदाराचे निधन

0

भुसावळ ;- येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्य्क फौजदार एजाज खान अहमदखान पठाण यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे .

गेल्या 15 दिवसांपूर्वी एजाज खान अहमदखान पठाण (58) यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर त्यांना जळगावच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते.

उपचार सुरू असतानाच त्यांची बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. याबाबचे वृत्त भुसावळातील पोलिस दलात धडकताच कर्मचार्‍यांनी हळहळ व्यक् केली. कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर दुपारी दोन वाजता मुस्लीम कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला. पठाण यांच्या पश्चात पत्न, मुलगा, दोन मुली, जावई, सून व नातवंडे असा परीवार आहे. गेल्या 35 वर्षांपासून पोलिस दलात प्रामाणिकपणे कार्य करणार्‍या पठाण यांचा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूनंतर पोलिस कर्मचार्‍यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.