चाळीसगाव पं.स.चे उपसभापती सुनील पाटलांच्या अपात्रेला ग्रामविकास मंत्र्यांकडून स्थगिती

0

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) चाळीसगाव येथील पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील यांना नुकतेच जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांनी अपात्र घोषित केले होते. या जिल्हाधिकारी साहेब यांच्या अपात्र निर्णयास  नुकताच राज्याचे ग्राम विकास मंत्री माननीय हसन मुश्रीफ यांनी स्थगिती दिली आहे.

याबाबत हकीकत अशी की चाळीसगाव पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून भाजपच्या सभापतिपदाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मतदान केल्याच्या कारणावरून भाजपाचे पंचायत समिती सदस्य व सध्याचे प्रभारी सभापती सुनील पाटील यांच्याविरुद्ध भा ज पा च्या वतीने मा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या अपात्रतेच्या प्रस्तावास मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी अपात्र घोषित सुनील पाटील यांना अपात्र घोषित केले होते.

जिल्हाधिकारी यांच्या आ देशाला, सुनील पाटील यांनी राज्य शासनाकडे अपील दाखल केले होते. अपिलाची सुनावणी काल राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्यासमोर झाली. माननीय मंत्री महोदय यांनी जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे सुनील पाटील यांचे पंचायत समितीचे सदस्य पद व उपसभापती पद कायम राहिल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदावर  विरजण पडले  आहे या सुनावणीदरम्यान पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील एडवोकेट ठोके उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.