खुशखबर : फेब्रुवारीत देशातील कोरोना होऊ शकतो हद्दपार

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्यामुळे आता भारतातील कोरोनाची साथ आता फेब्रुवारी महिन्यापर्यंत जवळपास हद्दपार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जगभरात मागील जवळपास आठ ते नऊ महिने धुमाकूळ घातल्यानंतर भारतातील कोरोनाचा फैलाव आता उतरणीला लागला आहे. देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होऊ लागल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापर्यंत भारतातील कोरोनाची साथ आता जवळपास संपुष्टात येणार असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. तज्ज्ञांनी देखील याला दुजोरा देत त्यामागील काही कारणे देखील सांगितली आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाच्या एका निदान झालेल्या रुग्णामागे सुमारे ९० रुग्णांचे निदान नोव्हेंबर महिन्यापर्यंत होऊ शकलेले नाही. हे प्रमाण सप्टेंबर महिन्यापर्यंत ६० ते ६५ रुग्णांपर्यंत होते. एकीकडे दिल्ली आमि केरळमध्ये एका कोरोनाबाधिता मागे सुमारे २५ रुग्णांचे निदान होऊ शकले नाही. तर हेच प्रमाण उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ३०० पर्यंत राहिले.

ही आकडेवारी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या त्याच पॅनेलने दिली असून भारतासाठी ज्यांनी खास सुपरमॉडेल बनवून फेब्रुवारी २०२१ पर्यंत भारतातून कोरोनाची साथ संपुष्टात येईल, असे सांगितले होते. राज्यवार आकडे सांगून या पॅनेलने हेसुद्धा सांगितले की, बहुतांश राज्यांमध्ये निदान झालेल्या प्रत्येक रुग्णामागे ७० ते १२० रुग्णांचे निदान होऊ शकलेले नाही.

एकंदरीत देशामध्ये एका कोरोनाबाधितामागे सुमारे ९० रुग्णांचे निदान झालेले नाही. याचाच अर्थ भारतातील बहुतांश लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. पण त्याचे निदान झाले नाही. हेच प्रमाण यूके आणि इटलीसारख्या देशांमध्ये केवळ १० ते १५ एवढेच राहिले आहे. तर दिल्लीमध्ये दुसऱ्या लाटेच्यावेळी ४३ रुग्णाचे निदान झाले नाही. तर तिसऱ्या लाटेच्यावेळी दिल्ली सरकारने अधिकाधिक चाचण्या करण्याची तयारी केली होती.

या पॅनेलमध्ये हैदराबाद आयआयटीसह वेल्लूर, कोलकाता, बंगळुरू या विज्ञान संस्थांच्या तज्ज्ञांचा समावेश असून मेडिकल रिसर्चच्या जर्नलमध्ये त्यांचे विश्लेषण प्रकाशिक करण्यात आला आहे. या पॅनलने आपल्या सुपरमॉडेलनुसार सांगितले की, भारतामधून कोरोनाची साथ जवळपास फेब्रुवारी २०२१ पर्यंत संपुष्टात येणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार नाही. तसेच देशात केवळ २० हजार अॅक्टिव्ह केस फेब्रुवारीपर्यंत राहणार आहेत. त्याचे कारण म्हणजे ज्या रुग्णांचे निदान होऊ शकले नाही. अशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

या पॅनलच्या म्हणण्यानुसार कोरोनामुळे भारतातील ६० टक्के लोकसंख्या बाधीत झाली आहे किंवा त्यांच्यामध्ये हर्ड इम्युनिटी विकसित झाली आहे. विश्लेषणात सांगण्यात आले की, अँटीबॉडी ६० टक्के लोकसंख्येमध्ये विकसित झाल्या आहेत. सणावारांच्या दिवसांमध्ये गर्दी होऊनही अनेक राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढले नाहीत, या आधारावर हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण दिल्लीत रुग्णसंख्या वाढली. तसेच उत्तराखंड आणि मेघालयमध्येही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.