जळगावात ठिकठिकाणी ‘एसीबी’च्या छापेमारीने खळबळ

0

जळगाव : जळगाव शहरातील सुनील झंवर यांच्या रमेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकल्याने खळबळ माजली आहे. सुनील झवर यांच्या प्रतिष्ठान सह भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या संबंधित पंधरा ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने द्वारे चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

तर दुसरीकडे बीएचआर पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या घरावर देखील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकल्याची माहिती आहे. त्याचबरोबर विवेक ठाकरे यांच्या या निवासस्थानी सुद्धा चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी शिवाजी नगरमधील जितेंद्र कंडारे यांच्या घरावर सुनील झवर यांच्या प्रतिष्ठान वर तर विवेक ठाकरे यांच्या निवासस्थानी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली.

परंतू आयकर विभागाचे पथकाने काय तपासणी केली याची माहिती मिळू शकली नाही. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची तपासणी सुरूच असून तपासणी नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात येत आहे.

याची माहिती मिळू शकली नाही. तर पथकातील सदस्य देखील काहीही माहिती द्यायला तयार नव्हते. दरम्यान, भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर नियुक्त प्रशासक जितेंद्र कंडारे यांनी ८ नोव्हेंबर २०१५ रोजी जळगाव एमआयडीसीतील पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे कुलूप तोडून ताबा घेतला होता. त्यानंतर बीएचआर या अवसायानात असलेल्या सोसायटी विरोधात व अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या साशंक कारभाराच्या विरोधात १९ जुलै २०१९ रोजी महाराष्ट्र व्यापी ‘धडकी भरो छत्री’ आंदोलन करण्यात आले होते. जितेंद्र कंडारे हे साशंक पद्धतीने काम करत असल्याने आम्हाला ठेवी परत मिळत नसल्याचा आरोप ठेवीदारांनी केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.