चाळीसगावात भाजपाला दुसरा मोठा झटका, माजी जिल्हाध्यक्ष डॉ संजीव पाटील यांचा राजीनामा

0

चाळीसगाव :-(प्रतिनिधी )

जळगाव जिल्ह्याचे भाजपाचे मातब्बर नेते श्री एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्षाचा सभासदत्वाचा राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यात नाथा भाऊ समर्थक यांचे राजीनामासत्र सुरू झाले आहे कालच चाळीसगाव तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे ताकतवर नेतृत्व कैलास सूर्यवंशी यांनी राजीनामा दिल्यानंतर आज जळगाव जिल्ह्याचे  भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष  डॉक्टर संजीव पाटील यांनी आपला सभासदत्वाचा राजीनामा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविला आहे.

त्यात त्यांनी नाथा भाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी  भारतीय जनता पक्षाच्या  सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे असे नमूद केले आहे तसेच लाड वंजारी समाजाचे चाळीसगाव तालुक्यातील नेते सतीश दराडे यांनीही  आपल्या पक्ष सदस्यत्वाचा  राजीनामा भा ज पा  पक्षश्रेष्ठींकडे पाठवले आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.