मराठा समाज आक्रमक, आजपासून मुंबई, पुण्याचा दूध पुरवठा रोखणार

0

कोल्हापूर: मराठा आरक्षण प्रश्नी पुढील निर्णय होईपर्यंत नोकर भरती थांबवण्याच्या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष करत पोलीस भरतीचा निर्णय घेतल्याने सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. या विरोधात आजपासून मुंबई आणि पुण्याला कोल्हापुरातून होणारा दुधाचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळी नऊ वाजल्यापासून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी प्रसंगी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येणार आहे. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील गोकुळ दूध संघाच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन केले जाईल. मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील आणि सचिन तोडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने तिढा निर्माण झाला आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार पाटील आणि तोडकर यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात ही गोलमेज परिषद होत आहे. यामध्ये ५० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. दुसरीकडे खासदार उदनराजे भोसले मराठा आरक्षण प्रश्नी आक्रमक झाले आहेत. त्यांनी दहा मागण्यांचं एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.