जळगावात एका दिवसात सोन्याच्या भावात तब्बल एक हजार रुपयाची वाढ ; जाणून घ्या दर

0

जळगाव ः गेल्या दहा दिवसांपासून स्थिरावलेला सोन्याचा दर पुन्हा वाढू लागले आहेत. सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये गर्दी वाढू लागल्याने सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. जळगाव सुवर्णनगरीत एका दिवसात सोन्याच्या भावात तब्बल एक हजार रुपयांनी वाढ झाली.

लॉकडाऊनमुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. कोरोना महासाथीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊ लागली. परिणामी लॉकडाऊन काळात सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र, अनलॉक सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या सोन्याच्या भावात घसरण झाली होती.
सोन्याच्या भावात घसरण झाल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून सोन्याचा भाव स्थिरावला होता. मात्र आता सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये वाढ झाली आणि याचा परिणाम पुन्हा सोन्याच्या दरावर पाहायला मिळतो आहे. जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ झाली.

जळगावमध्ये आज सोन्याचा दर प्रतितोळा 52 हजारांवर पोहोचला आहे. तर सोन्यापाठोपाठ चांदीही चार हजार रुपयांची वाढली आहे. चांगी 63,000 प्रति किलो झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.