गुड न्यूज ! उचंदा अंतर्गत येणारे 22 गावे कोरोना मुक्त

0

कु-हा काकोडा, ता.मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्र उचंदा अंतर्गत येणारे 22 गावे कोरोणा मुक्त झाल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अमितकुमार घडेकर यांनी लोकशाही प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्र उचंदा अंतर्गत येणारे ,डोलारखेडा 68 चिखली 13 उचंदा 3 घोडसगाव 2शेमडदे १  मेढोदे1  मुढोडदे 1येथे कोरोना बांधित रुग्ण आढळून आले होते.
यासर्वांवर योग्य ते उपचार करून उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे तसेच जळगाव जिल्हा रुग्णालय व येथे उपचार करून सर्वच रुग्ण कोरोना मुक्त होऊन रुग्णालयातून  घरी गेलेले आहेत.सद्यस्थितीत एकही ऍक्टिव्ह रूग्न प्रा, आ ,केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये नाही .त्यामुळे प्रा, आ ,केंद्र उचंदा हे कोरोना मुक्त झालेले आहे.

सदर कोरोना बाधित रुग्ण आढळले असता सर्व ठिकाणी ग्रामस्तरीय समिती मा,सरपंच मा. ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, आरोग्य कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेऊन संपर्कातील लोकांना तपासणी करून घेण्यासाठी प्रवृत्त करून मोलाचे योगदान दिले.
तसेच आरोग्य कर्मचारी आशा कार्यकर्त्या अंगणवाडी यांनी सर्वेक्षण करताना अत्यंत मोलाचे योगदान दिले. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी खंडित होऊन सर्व गावे कोरोनामुक्त होण्यास मदत झाली.

तहसीलदार श्याम वाडकर, गट विकास अधिकारी सुभाष मावळे या उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ योगेश राणे तालुका आरोग्य अधिकारी डॉ निलेश पाटील यांचे मोलाचे नियमित मार्गदर्शन व सहकारी मिळाले
प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ, अमित कुमार घडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ तुषार पाटील, डॉक्टर स्नेहल तायडे, डॉ कृष्णा सुर्वे व तसेच आरोग्य सहाय्यक श्री बोरसे, आरोग्यसेविका मंदाकिनी वाघुळळदे, आरोग्य सेवक ऐशी, श्री विसपुते, श्री पवार आरोग्यसेविका श्रीमती सपकाळे तसेच प्रयोगशाळा विज्ञान अधिकारी प्रदिप पटेल सर्व आशा कर्मचारी अंगणवाडी सेविका यांनी सलग् दिड महीना प्रामाणिकपणे कामे करून प्रा. आ.केंद्र उचंदा कोरोना मुक्त होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

सद्यस्थितीत कोरोणा मुक्त असले तरी कोरोणा संक्रमण पुन्हा उद्भवू नये यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्ससिंग ठेवणे, नियमित माक्स वापरणे ,कारणा शिवाय बाहेर न पडणे तसेच प्रशासनाचे सर्व सूचनांचे पालन करण्याचें आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, निलेश पाटील. डॉ,अमितकुमार घडेकर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.