मुक्ताईनगर येथे जि.जि.खडसे महाविद्यालयात नविन कोविड सेंटर सुरू

0

मुक्ताईनगर : तालुक्यात कोरोना रुग्णांनी द्विशतक पुर्ण केले आहे. मुक्ताईनगर शहरा बरोबर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आजमितीस तालुक्यात 200 रुग्ण आढळून आले असून त्यातील 3 रुग्ण मृत झाले आहेत, तर 67 रुग्णांनी उपचार घेऊन कोरोना वर मात केली आहे 130 रुग्ण उपचार घेत आहेत.

हे रुग्ण आणि क्वारंटाइन केलेले रुग्ण यांना ठेवण्यासाठी प्रशासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह आणि आदिवासी मुलांचे वसतीगृह कोविड सेंटर म्हणुन अधिग्रहित केले होते परंतु दररोज रुग्ण संख्या वाढत असल्या कारणाने येथिल व्यवस्था अपुर्ण पडत होती हि बाब लक्षात घेऊन  माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे आणि मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जि. जि खडसे महाविद्यालयातील मुलींचे हॉस्टेल कोविड सेंटर  ला देऊ केले होते तशी सुचना त्यांनी तहसीलदार यांना केली होती.

त्यानुसार मुक्ताईनगर तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या आणि अपुर्ण पडणारी कोविड सेंटरची जागा हि बाब लक्षात घेऊन तालुका प्रशासनाने श्रीमती जि जि खडसे महाविद्यालयातील मुलींचे हॉस्टेल कोविड सेंटर म्हणुन अधिग्रहित केले  असुन मुलींच्या वस्तीगृहात जवळपास 200 रुग्णांची व्यवस्था झाली आहे. यासाठी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीने वसतीगृह आणि पलंग कोविड सेंटर ला उपलब्ध करून दिले आहेत. सुरू झालेल्या या कोविड सेंटरमध्ये नविन रुग्णांना ठेवण्यात आले आहे.

मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीने कोविड सेंटर साठी उपलब्ध करून दिलेले हे वसतीगृह उंच टेकडीवर असल्या कारणाने पुरेसा सूर्यप्रकाश आणि मोकळी नैसर्गिक हवा रुणांना मिळणार आहे. संस्थेची स्व मालकीची वसतिगृहाची इमारत स्वतः पुढाकार घेऊन कोविड सेंटर ला उपलब्ध करून दिल्या बद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन रोहिणी ताई खडसे खेवलकर यांचे तालुका भरातून कौतुक होत आहे. मुक्ताईनगर तालुक्यात वाढती रुग्ण संख्या बघता तालुका लवकर कोरोना मुक्त व्हावा अशी प्रार्थना करताना सर्व जण दिसुन येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.