अखेर ठरलं! १२ वीचा निकाल १५ जुलैपूर्वी, तर १० वीचा जुलै अखेरपर्यंत !

0

मुंबई, : बारावी व दहावीचे निकाल लवकरात लवकर लागावेत यासाठी वेगाने प्रक्रिया सुरू आहे. बारावीचा निकाल 15 जुलैपूर्वी, तर दहावीचा जुलै अखेरपर्यंत जाहीर होईल, असे बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला. यावेळी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु असून 15 जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल लावण्याचा पूर्ण प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांना दिली. 97 टक्के उत्तरपत्रिका या कोरोना काळात परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून स्कॅनिंगही वेगाने सुरु आहे; अशी माहिती त्यांनी दिली.मार्चमध्ये झालेल्या दहावी परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 आणि बारावीसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसले होते. बारावीचे सर्व पेपर्स कोरोनामुळे लॉकडाउनपूर्वी संपले होते मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. त्यामुळे भूगोलासाठी सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाइन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल अ‍ॅप अशा सुविधा देण्यात येत आहेत. 1 जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल, अशी माहिती यावेळी विभागाने दिली.

जिओ टीव्ही वर प्रायोगिक तत्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या
जिओ टीव्ही वर प्रायोगिक तत्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या टीव्ही वर पहिली ते बारावी असे स्वतंत्र 5 वाहिन्यांचे सुध्दा नियोजन आहे असे सांगण्यात आले. दूरदर्शनकडे देखील दिवसाला 4 ते 5 तास शैक्षणिक तास आयोजित करण्याचे नियोजन आहे, असे यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

1 जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल
दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल एप अशा सुविधा देण्यात येत आहेत. 1 जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल, अशी माहिती यावेळी विभागाने दिली.

ग्रामीण भागात ऑफलाईन प्रक्रिया
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक या विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन चालणार असून इतरत्र व ग्रामीण भागात ऑफलाईन प्रक्रिया चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित चालतील असे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.