भुसावळात पिस्तुलचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटले

0

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील शनि मंदिर वार्ड भागातील किराणा मालाच्या व्यापाऱ्याचा दोन युवकांनी पिस्तोलचा धाक दाखवून मोबाईल पळवून नेल्याची घटना येथे रविवारी घडली .या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शहरातील शनीमंदिर वार्डातील रहिवाशी राजेश रमाशंकर दुबे यांचे किराणा दुकानात रविवारी रात्री दोन जण
यामध्ये संशयीत आरोपी बाबा काल्या (पूर्ण नाव माहीत नाही) तसेच रईस (पूर्ण नाव माहीत नाही)म नी कमरेचे पिस्तोल काढून पिस्तुलचा धाक दाखवत दुबे यांना हातवर करायला लावले दुबे यांनी भीतीपोटी हात वर केल्याने त्यांच्या हातातील सॅमसंग कंपनीचा एस 8 मोबाईल हिसकावून पळ काढला.

याप्रकरणी फिर्यादि व्यापारी राजेश दुबे यानी बाजारपेठ पोलीस स्टेशनला फिर्यादिवरु न गु.र.न.667/2020 भा.द.वि.कलम 394,323, 504,506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी भेट देऊन झालेल्या घटनेची पाहणी केली. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अनिल मोरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.