भुसावळात राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना किराणा सामानाचे वाटप

0

भुसावळ (प्रतिनिधी) :  अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष व राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष इम्रान खान यांच्याकडून भुसावळात स्वखर्चातून गरजूंना महिनाभर पुरेल इतक्या किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.

गरजु कुटुंबातील महिलांना पाच किलो आटा, एक किलो साखर, एक लिटर तेल, दोन किलो तांदूळ व इतर किराणा साहित्य गरीब लोकांना आले. इम्रान खान यांनी गरजु कूटुंबाना पुढील सहा महिन्यांसाठी सात हजार ५०० रुपये तसेच मनरेगा अंतर्गत २०० रुपये दिवसाचा रोजगार तसेच सूक्ष्म, लघु आणी मध्यम उद्योगतील रोजगार वाचविण्यासाठी थेट खात्यात आर्थिक मदत करुण केंद्र सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी आमिर खान, सिद्ध साळुंके, शेख तौफीक व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.