जळगाव कोवीड रुग्णालयातील बेपत्ता वृद्ध पाचोरा येथे सापडला

0

पाचोरा : जळगाव येथील कोविड -१९ रुग्णालयात कोरोना बाधित म्हणून उपचारार्थ दाखल असलेला 80 वर्षीय वृद्ध दोन दिवसांपासून बेपत्ता झाला होता. पोलिसांनी केलेल्या शोध मोहिमेदरम्यान सदरचा वृद्ध पाचोरा येथे सापडला असुन त्यास पाचोरा येथील कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे.

नगरदेवळा ता. पाचोरा येथील ८० वर्षांचा वृध्द दि. १८ जुन रोजी जळगांव येथील कोविड सेंटर मधुन बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती.  संशयीत कोरोना बाधिताला शोधण्यास पाचोरा पोलिसांना यश आले आहे. पाचोरा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील, निलेश गायकवाड, वसंत पाटील यांच्या तपासा अंती शहरातील जारगाव चौफुलीवर सदर वृद्ध आढळुन आला. याबाबत जळगाव जिल्हापेठ पोलिसात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहितीच्या आधारावर पाचोरा पोलीसांनी त्यांना पाचोरा कोविड सेंटर येथे दाखल केले होते. परंतु नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार सदर संशयीताचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.