सौरव गांगुलीच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण

0

कोलकाता । भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कुटुंबियांना झाली करोनाची बाधा झाल्याचे आता पुढे आले आहे. या सर्वांवर आता एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी एक चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर त्यांच्या उपचाराची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुलीची पत्नी आणि तिच्या आई-बाबांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती, पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने दिली आहे. स्नेहाशिष गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनमध्ये सचिव या पदावर काम करतत. स्नेहाशिष यांच्या घरी काम करणारा व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह आढळला होता. यानंतर घरातल्या लोकांची चाचणी केली असता, स्नेहाशिष याची पत्नी व सासु-सासऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आढळला आहे. स्नेहाशिष याचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला आहे. स्नेहाशिषने रणजी क्रिकेट सामन्यात बंगालचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

मोमिनपूर येथील एका खासगी रुग्णालयात या सर्वांवर उपचार सुरु आहेत. या सर्वांची शनिवारी अजून एक चाचणी घेण्यात येणार आहे. सध्या या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ” जेव्हा या चारही व्यक्तींना समस्या जाणवायला लागली तेव्हा आम्ही त्यांची करोना चाचणी घेतली आणि त्यांची ही चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे आता त्यांच्यावर आम्ही उपचार करत आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.