फैजपूर येथील पोलीस अधिकाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

0

फैजपूर । प्रतिनिधी

एका पोलीस अधिकाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना विरोधात पहिल्या दिवसापासून चोख जबाबदारी पार पाडत असलेल्या हा योद्धा लवकरच कोरोनातून बरा होईल व सेवेत पुन्हा नव्याने रुजू होईल अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करू या. बस स्टँड मागील या अधिकाऱ्याच्या घराजवळील परिसर सील करण्यात येत आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. विनाकारण बाहेर फिरू नये, ओट्यावर बसू नये. मास्कचा वापर करावा. वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा. वरिष्ठांचे आदेश पाळावे. आताच खरी वेळ आहे. प्रत्येकाने हे ही बाब गांभिरर्याने घ्यावी. आपल्या सह कुटुंबाचे रक्षण करावे. अन्यथा वेळ गेल्यावर पश्चात्ताप करावा लागेल. कोरोनात कोणी कोणाला सहकार्य करीत नाही. आपण आपली काळजी घ्यावी ही सर्वांना कळकळीची विनंती. सर्वांना सांगा. माहिती द्या. जनजागरण करा. आपली शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करा.

Leave A Reply

Your email address will not be published.