खामगांवात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

0
खामगांव (गणेश भेरडे) :- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी अस्त्र म्हणून सोशल डिस्टंसिंगचा वापर करण्यात येत आहे. मात्र खामगांव शहरात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला असून शहरात कोरोनाचा केव्हाही शिरकाव होऊ शकतो या गंभीर बाबीकडे नगर परिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे तर दुसरीकडे मुख्याधिकारी तोडी करण्यात मशगुल असल्याचे चित्र खामगांवकरांना पाहायला मिळत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खामगांव शहरातील बालाजी प्लॉट भागात अग्रसेन चौक ते एकबोटे चौक पर्यंतच्या मार्गावर बँक ऑफ इंडिया व एक्सीस बँक असून बँकेत येणाऱ्या ग्राहकांमुळे ह्या रस्तावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लावलेले असल्याने सावलीचा फायदा घेऊन याच वर्दळीच्या रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून भाजी विव्रेâते ठाण मांडून बसले आहेत. अगोदरच बँकेत येणारे ग्राहक त्यात शहरातील सर्व भागातील भाजी खरेदी करणाNया नागरिकांची या रस्त्यावर होणाNया गर्दीमुळे रस्त्यावरुन पायी चालणे देखील कठीण होत असून दररोज सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत आहे. या सर्व प्रकाराकडे न. प. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे तर दुसरीकडे मुख्याधिकारी याकडे कानाडोळा करून केवळ तोडी करण्यात मशगुल आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी न. प. चे फिरते पथक नावाला असून शहरातील प्रभाग सॅनीटाईज न करता एअर वंâडीशंड गाडीमध्ये हे पथक सहलीचा आनंद घेत असल्याचा अनुभव खामगांवकर नागरीक घेत आहे.
वेळीच या भागातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले नाही तर कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. तर जिल्हाधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.