माणुसकीला काळिमा फासणार्‍या दोन घटना!

0

चांगभलं…

धों.ज.गुरव
मो.नं.9527003897

जळगाव जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणार्‍या दोन घटना एकाच दिवशी घडल्या . जळगाव शहरात धामणगाव वाड्यात राहणार्‍या आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची अमानुषपणे केलेली हत्याही एक घटना होय. दुसरी जामनेर तालुक्यातील वाकडी या गावाची होय. शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांना मारहाण करून त्यांची नग्नावस्थेत काढलेली धिंड होय . या दोन्ही घटनांमधील साम्य म्हणजे अत्याचार करून ज्या चिमुकलीचे हत्या झाली ती मागासवर्गीय समाजातील आहे . त्याचबरोबर अल्पवयीन मुलांना मारहाण करून धिंड काढण्यात आली . ती पीडित मुलेही मागास समाजाचीच आहे. हा एक विचित्र योगायोग म्हणावा लागेल. बलात्कार, अत्याचार
विरोधात शासनाने कडक कायदा केला असतानासुद्धा अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमांना त्याबाबत कसलीही भीती वाटत नाही. हे कसले दुर्दैव. आठ वर्षीय बालिका सायंकाळी 6 वाजता घरातून खेळायला बाहेर गेली ती घरी आलीच नाही. रात्रभर तिचा शोधाशोध केला .ध्वनीक्षेपकावरून दवंडी पिटली गेली. पीडित बालिकेची आई रात्रभर झोपली नाही
सकाळी कचरा वेचणार्‍या महिलेला जवळच असलेल्या एका टेकडीवर एका गोणपाटात बालिकेचा मृतदेह आढळला . त्यानंतर धावाधाव झाली . पोलीस घटनास्थळी पोहचले . श्‍वानपथके तेथे आले. परिसरातील लोकांची एकच गर्दी झाली . गोणपाट उघडून पाहतात तर विचित्र अवस्थेत बालिकेचा मृतदेह होता . पीडित बालिकेचा मृतदेह सापडेपर्यंत सर्व काही सिनेस्टाईल वातावरण होते. पोलिसांनी त्यांचे शोध कार्य सुरु केले असता आदेश बाबा याला अटक करण्यात आली आहे .
जामनेर तालुक्यातील वाकडी येथील घटनासुद्धा रविवारची आहे. दुपारच्या वेळेला वाकडी गावातील दोन अल्पवयीन मुले गावातील ईश्‍वर जोशी यांच्या शेतातील विहिरीत पोहायला गेले. पोहत असताना विहीर मालक ईश्‍वर जोशी यांनी त्यांना पकडले. त्या तीन अल्पवयीन मुलांना पट्ट्याने आणि काठीने बेदम
मारहाण तर केलीच. एवढ्यावरच न थांबता त्या तिन्ही मुलांना नग्न करून त्यांची धिंड काढली हा अघोरी प्रकार करण्यामागचा हेतू विचित्रच म्हणावा लागेल. एवढे करूनही विहीर मालक थांबले नाही. मुलांना लग्न करून मारहाण करताना त्याचा व्हिडीओ काढला आणि तो व्हायरल केला. हे करण्याचे कारण काय ? लहान बालकांना नग्न करून मारहाण करण्यात कसले शौर्य म्हणावे. केवळ असा प्रकार करून आपला कंड शमवून घेतला आहे. आपल्या शेतावरील विहिरीत परवानगी न घेता पोहचण्यासाठी ती मुलं गेली हे समजू शकतो. तसेच त्या मुलांचे विहिरीत काही बरे वाईट झाले असते तर ते विहीर मालकावर बेतले असते इथपर्यंत समजू शकतो. हे होत असले तरी कायदा हातात घेण्याचे कारण काय ? विहिरीत पोहत असलेल्या तिन्ही बालकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे होते. किंवा त्यांच्या पालकांना भेटून त्यांची समजूत घालून त्यांचे सुपूर्द द्यायला हवे होते. तसे त्यांनी न करता कायदा हातात घेऊन त्या मुलांवर अत्याचार केला. हे तिन्ही पीडित मुले जेव्हा त्यांच्याघरी गेले आणि सर्व हकीगत सांगितली . तेव्हा त्यांचे पालक तडक पहूर पोलीस स्टेशन गाठून दुर्गाबाई चांदणे हिने फिर्याद दिली , तिच्या फिर्यादीवरून पहूर पोलिसांनी ईश्‍वर जोशी आणि कैलास लोहार या दोघांना तातडीने अटक केली . आज त्या दोघांना जामनेर कोर्टात हजार केले. पोलिसांनी फिर्याद दाखल होताच जी तत्परता दाखविली त्याबद्दल पहूर पोलिसांचे कौतुक करावे लागेल. कारण त्या घटनेच्या गांभीर्याची दाखल घेतली हि चांगली बाब होय . त्याचबरोबर फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करून घेताना आरोपींवर जी कलमे लावली आहेत तीसुद्धाअभ्यासपूर्ण आहेत. आरोपीना जामनेर कोर्टात हजर केल्यानंतर कोठडी सुनावली आहे. जी अमानुष पद्धत विहीर मालकाने वापरली त्याच्या बुद्धीची किंवा करावीशी वाटते . जळगाव शहरात मंगळवारी चिमुकली गायब झाल्यानंतर समतानगर परिसरात घबराटीचे वातावरण होते . दुसरे दिवशी सकाळी चिमुकलीचा मृतदेह गोणपाटात विचित्र अवस्थेत आढळल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत होता. पोलिसांनी आज दिवसभरात सूत्रे फिरविली आणि संशयित आरोपी त्याभागातच राहणार्‍या आदेशाबबाबाला अटक केली . पोलिसांच्या चौकशीतून सत्य निष्पन्न होईलच. जळगावच्या संतानगरमधील बालिकेच्या अमानुष हत्येने आणि जामनेर तालुक्यातील वाकडी येथील तीन मुलांना नग्न करून मारहाण केल्याच्या घटनेने मात्र माणुसकीला काळिमा फसला आहे. आठ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून अमानुष हत्या करणार्‍या नराधमाला कठोरात कठोर शासन झाले पाहिजे. त्याचबरोबर तीन अल्पवयीन मुलांना नग्न करून मारहाण करून त्याचा व्हिडीओ काढून व्हायरल करणार्‍या त्या दोघांना धडा शिकविण्याची गरज आहे तसे झाले नाही तर इतरांची हिंमत वाढेल यात शंका नाही .

Leave A Reply

Your email address will not be published.