आर.आर. शाळेच्या मुख्याध्यापकांना अरेरावी

0

जळगाव – शहरातील रावसाहेब रुपचंद (आर.आर) शाळेच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापक डी.एस. सरोदे यांनी गावगुंडांनी अडवून अरेरावी केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुख्याध्यापक श्री. सरोदे हे जिल्हापेठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, हे गावगुंड संचालक अरविंद लाठी यांनी पाठविले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सकाळी 7 वाजेच्या सुमारास श्री. सरोदे शाळेत प्रवेश करीत असताना त्यांना प्रवेशद्वारावर दोन तरुणांनी अडवून शिवीगाळ करीत शाळेत येण्यास मज्जाव केला. शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेला हा प्रकार शिक्षणक्षेत्राला काळीमा फासणारा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.