पालकमंत्री गुलाबरावाकडून जिल्हावासियांच्या अपेक्षा

0

उशिरा का होईना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची नियुक्ती झाली. फडणवीस सरकारमध्ये गुलाबरावाकडे राज्यमंत्रीपद होते. राज्यमंत्र्याला धोरणात्मक निर्णय घेण्याचे कसलेही अधिकार नसल्याने विकास कामाच्या संदर्भात कॅबिनेट मंत्री विशेषतः पालकमंत्र्यावर अवलंबून राहावे लागते. असे राज्यमंत्री असताना गुलाबराव म्हणायचे आता ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्याना पाणीपुरवठा आणि स्वच्छता हे खाते मिळाले आहे. विशेष म्हणजे तेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हावासियांच्या अपेक्षा त्यांचेकडून वाढलेल्या आहेत. पालकमंत्री झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या जाहीर सत्कार होतोय.

विकासाची कामे तसेच जनतेची कामे होत नसतील आणि त्याला अधिकाऱ्याकडून कोलदांडा घातला जात असेल अशा अधिकाऱ्यांची खैर नाही. शिवसेना स्टाईलने कामे केली जातील असा इशारा गुलाबरावानी दिला. जळगाव जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात पाटचाऱ्यासाठी एक  दमडीही निधी मिळाला नाही. महाविकास आघाडी सरकारकडून ३५० कोटी रुपयाचा निधी मजुरीचा प्रस्ताव दिल्याचे गुलाबरावानी सांगितले. शेवटच्या शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले त्याचबरोबर जिल्ह्यातील रखडलेल्या सिचन प्रकल्पासाठीसुद्धा कसलाच निधी मागच्या सरकारने दिला नाही. विधानसभा निवडणुकी आधी तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी मेघा  रिचार्ज प्रकल्पासाठी निधी मंजूर झाल्याची घोषणा केली मग ती मंजूर झालेला  निधी गेला कुठे?असा सवालही गुलाबरावानी केला आहे एकंदरीत मंत्री गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्याचे असून सुद्धा जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित सिचन प्रकल्पासाठी काहीही केले नाही असा होय. माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या नजीकचे असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाबाबत त्यांचेकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या तथापि भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्या आपसातील वादामुळे जिल्ह्याच्या विकासाचा  खेळखंडोबा झाला. जिल्ह्याच्या विकासाचा राहिलेला बॅकलॉग भरून काढून जिल्हा सुजलाम सुफलाम करन्याची जबाबदारी आता नवे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेवर आहे. गिरीश महाजन यांचे प्रमाणेच गुलाबराव पाटील हे सुद्धा विद्यमान मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांचे नजीकचे म्हणून ओळखले जातात.

त्याच्यात आणि मुख्यामंत्र्यात असलेल्या संबंधांचा फायदा घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या  प्रमाणात निधी खेचून आणावा प्रलंबित विकासकांमाच्या पुर्वतेबरोबरच त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात एखादा लक्ष्यवेधी प्रकल्प आणावा जेणेकरून ती  त्यांच्या कार्यकाळाची ओळख राहील. जिल्ह्यातील उधोगधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेऊन बंद पडलेले उद्योग सुरु  करण्यासाठी आणि आजारी उद्योगांच्या पुनर्जिवनासाठी प्रयन्य होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील जिराईत शेतकरी केळी उत्पादक ऊस उत्पादक कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे. विशेषतः जळगाव ते औरंगाबाद फागणे ते तरसोद या दोन महामार्गाचा नागरिकांना मोठा त्रास भोगावा लागत आहे. दररोज होणाऱ्या अपघातामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागत आहे. महामार्गाच्या या कामाला पालकमंत्री या नात्याने चालना देण्याची गरज आहे. त्याकरिता जिल्ह्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना वाघूर धरणातून पाणी पुरवठा होतो धरणात मुबलक पाणी असून सुद्धा जळगावकरांना नियमित पाणी मिळत नाही. वारंवार पाईप लाईन फुटीचे कारण दिले जाते. तसेच दोन दिवसाआड होणारा  पाणी पुरवठा सुद्धा पुरेसा केला जात नाही. याची चौकशी करुण संबधित अधिकाऱ्यांना कानपिचक्या देण्याची गरज आहे. नशिराबाद हे आपल्या मतदार संघातील मोठे गाव तेथे लवकरच नगरपंचायत करण्याची घोषणा आपण केलीत हि चांगली गोष्ट असली तरी गेल्या उन्हळ्यात नशिराबादकरांना १५ दिवसानंतर पाणी मिळत होते त्यामुळे नशिराबादकराना हाल सोसावे लागले. त्यासाठी नशिराबादच्या पिण्याच्या पाणी प्रश्न मार्गी लावावा. धरणगावकरांना  सुद्धा पाणी मिळत नसल्याची ओरड आहे. असोदा गावाचीही पाणी टंचाई गंभीर समस्या आपल्या कार्यकाळात सुटेल हीच अपेक्षा आहे. विशेषतः धरणगाव आणि असोदा हे आपल्याच मतदार संघातील आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील सर्व गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्या कार्यकाळात मार्गी लागेल हीच अपेक्षा मागच्या सरकारच्या कालावधीत काय झाले नाही अथवा काय होऊ शकले नाही याबाबत आता आरोप प्रत्यारोप करण्यात आपण आपला वेळ घालवू नये केवळ विरोध केल्याने जिल्ह्याचा विकास होणार नाही.

जनतेचे प्रश्नही सुटणार नाहित. जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना विकास कामाच्या सदर्भात आपण आमदारांना जे मार्गदर्शन केले त्याबद्दल तुमचे अभिनंदन कारण आपलेच एक मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील ह्यांनी जिल्हा बँकेच्या संदर्भात अभ्यास नसताना कसलीही माहिती न घेताना प्रतिस्पर्धी एकनाथराव खडसे यांचेवर जे तोंडसुख घेतले ते अशोभनीयच आहे. निवडणुकीत निवडून येण्यासाठी खालच्या थराला जाऊन आरोप प्रत्यारोप होतात ते समजू शकतो परंतु आता आपण आमदार म्हणून कार्यरत असताना जबाबदारीने वागले व बोलले पाहिजे. याउलट आपणास पत्रकारांनी बँकेच्या संदर्भात विचारले असताना तो संचालक मंडळाचा प्रश्न असून नियमित कर्जफेड लक्ष्यात घेऊन कर्ज मंजूर केले असावे त्याबद्दल न बोललेले बरे.

त्याचबरोबर भाजप जिल्हाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या गोंधळाबद्दलही आपण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून त्यावर भाष्य करण्याचे टाळले त्यांबद्दलही तुमचे अभिनंदन अशा प्रकरणात आपली शक्ती खर्च करण्यात मजबूत करण्यात काहीही अर्थ नाही आपली संघटना मजबूत करण्यावर भर द्यावा गुलाबराव आपण जर अशा पद्धतीने काम कराल विकास कामे हाच आपण अजेंडा ठेवालं तर आपण जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या मंत्र्यांमध्ये वेगळा ठसा उमटवू शकता. आपल्या भावी वाटचालीस ‘दैनिक लोकशाही’च्या शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.