विविध कार्यक्रमाच्या परवानग्या आता ऑनलाईन !

0

भडगावचे पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी दिल्या नागरिकांना सूचना

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये वार्षिक यात्रा, मिरवणुकीचा सण, उत्सव कार्यक्रम साजरा करत असतो या बाबत परवानगीसाठी पोलिस स्टेशन ला अर्ज करावा लागतो. या सर्व परवानग्या आता ऑनलाईन झाल्यामुळे भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी सूचना दिल्या आहे.

भडगाव तालुक्यातील नागरिकांनी  पोलीस स्टेशनला परवानगीसाठी  (यात्रा व इतर सर्व प्रकारच्या परमिशन) घेण्यासाठी येत असताना  सोबत पासपोर्ट फोटो, आधार कार्ड , अर्ज ,सोबत ठेवावे यानंतर यात्रा,मिरवणुक,गणपती,दुर्गात्सव, मोहरम,इतर सर्व परवानगीसाठी ऑनलाइन प्रकरण भरूनच पोलीस स्टेशनला द्यावे .सर्व प्रकारच्या परमिशन ऑनलाइन झाल्या असून  याबाबत नागरिकांनी सुचना देण्यात आल्या असल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी लोकशाही शी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.