अमळनेर रिडर्स असोसिएशनचा हौशी वाचकांसाठी अभिनव उपक्रम !

0

अमळनेर (प्रतिनिधी)  येथे पुस्तकं वाचनाची आवड असणाऱ्या युवावर्गाने एकत्र येत वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे.  ‛ अमळनेर रिडर्स असोसिएशन ’ ही हौशी वाचकांची संघटना गेल्या सहा महिन्यांपासून वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी वाचनकट्ट्यासारखे विविध उपक्रम राबवित आहे.

आठवड्यातुन एक दिवस उदयकुमार खैरनार यांच्या निवासस्थानी दर रविवारी सायं. 4 वाजता – पटवारी कॉलनी परिसरात सर्व वयोगटातील वाचनप्रेमींनी एकत्र येत आहेत. वाचनात आलेल्या पुस्तकांवर तासभर चर्चा करणे, इतरांना वाचनासाठी प्रेरित करणे, अश्या या सर्जनशील उपक्रमात, ‛ मी काय वाचतो , काय वाचावं ’ या विषयावर चर्चा घडवली जाते आहे. सोबतीला तज्ञ पाहुण्यांना आमंत्रित करून संवादसत्र होत आहेत. साहित्याचा अन समाजाचा अनुबंध घट्ट करू पाहणाऱ्या या सर्जनशील उपक्रमाचे संचालन व्हाट्सऍपग्रुपच्या माध्यमातून होत आहे.

या उपक्रमाचे आयोजन निखिल बैसाणे , मेघागौरी घोडके , उदयकुमार खैरनार , युवावक्ते सारांश सोनार,  स्वप्नील चव्हाण, सोनिया भावसार, ज्योती वनडोळे, भोजराज पाटील, गुंजन क्षीरसागर, विवेक अहिरे, पूजा सुरसुरे,  प्रा. कृष्णा संदानशिव, सुवर्णा देसले, योगेश संदानशिव-  इत्यादींनी केले आहे.आजच्या गतिमान जीवनात वाचन संस्कृती जोपासणारा एक अनोखा उपक्रम म्हणून अनेक क्षेत्रातील जाणकारांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे . या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी निखिल बैसाने 8983962044 , उदयकुमार खैरनार 7083887603 , सारांश सोनार   9075490480  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.