माळी समाजाचे रविवार 17 रोजी जळगावी अधिवेशन

0
देणगीदारांसह लोकसहभागातुन उभारलेल्या वास्तुत गरजु विद्यार्थ्याना निवासाची सुविधा- नानाभाऊ महाजन,जि.प.सदस्य तथा क्षत्रीय माळी समाज मंडळ अध्यक्ष यांचे प्रतिपादन,
खोटेनगर वाटीकाश्रम मंडळाच्या प्रांगणात आज 31 वे अधिवेशन
जळगांव.दि.16- महाराष्ट्र हि संतांची भुमी असून सावता महाराज, क्रांतीज्योती थोर समाजसुधारक म. ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, छ.शाहु महाराज,आंबेडकर यांच्या विचारधारेच्या प्रेरणेतुन समाजाला दिशा मिळावी या उद्देशाने क्षत्रीय माळी समाज मंडळाची स्थापना सन 1975 मधे करण्यात आली. राज्यभरातुन तसेच परराज्यात देखिल अनेक समाजबांधव सभासद आहेत. त्यातील उदार दाते देणगीदार यांच्या माध्यमातुन क्षत्रीय माळी समाज मंडळाची  स्वतःची वास्तु उभारणी करण्यात आली असून या वास्तुत गरजु विद्यार्थ्याना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  यात शासनाकडून कोणतेही अनुदान वा मदत घेतलेली नाही.शासन अनुदान घेतल्यास अनेक मर्यादा येतात. खोटेनगर वाटीकाश्रमाजवळ मंडळाच्या प्रांगणात या मंडळाचे आज 17 रोजी 31 वे अधिवेशन आयोजीत करण्यात आले असल्याची माहिती क्षत्रीय माळी समाज मंडळाचे प्रांतीय सचीव तथा जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन यांनी लोकलाईव्हच्या मुलाखतीत दिली.
यांनी नोंदविला सहभाग
 याप्रसंगी चर्चेत क्षत्रीय माळी समाज मंडळाचे सचीव प्रमोद माळी, प्रांतीय मंडळ अध्यक्ष निळकंठ महाजन, कार्यकारी मंडळ सदस्या योगीता महाजन, सदस्य रविंद्र महाजन आदी सहभागी झाले होते.
यांची रहाणार उपस्थिती
या अधिवेशनास आ. राजुमामा भोळे, आबा कापसे, मोठे मंडळ अध्यक्ष निळकंठ महाजन आदी मान्यवरासह पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
जिल्हयात आतापर्यत विविध ठिकाणी अधिवेशन
क्षत्रीय माळी समाज मंडळातर्फे आज 17 रोजी 31 वे अधिवेशन दोन सत्रात घेण्यात येणार आहे. यासह नवयुवक मंडळातर्फे रक्तदान शिबिर यात 50 बॉटल रक्त संकलनाचा संकल्पासह महिलांसाठी हिमोग्लोबीन आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान सह इतर परराज्यात देखिल समाज विखुरलेला आहे. समाज मंडळाचे सुमारे 3 हजार सभासद सदस्य आहेत. या अधिवेशनासाठी 1 हजाराचे वर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित रहाणार असून जळगांव येथील पदाधिकारी कार्यकर्ते या अधिवेशनाच्या जबाबदारी पार पाडत आहेत. चोपडा, चहार्डी, लासूर, अडावद, विखरण, दहिगांव, पारोळा, तळोदा, किनगांव, धानोरा, तामसवाडी या गावांत आतापर्यत अधिेवेशने घेण्यात आली आहेत.
स्त्री शिक्षण, विधवा परीतक्त्या यासह दुर्बल घटकांना सोबत घेवून साामाजिक, शैक्षणिक आदी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.क्षत्रीय माळी समाज हा व्दितीय क्रमांकावर असून राज्यात बहुसंख्य समाजाला सोबत घेवून पुढे जात आहे. या समाजाला ओबीसी गटात  संधिवानाव्दारे आरक्षण असून विविध प्रांतात अनेक नावाने ओळखला जातो. या समाजात 27 पोटजाती असून परराज्यात जाणे पुर्वी वाहने वा अन्य साधनांचा अभाव यामुळे परीसरातच पोटजातीतच सामाजिक नाते विवाह संबंध होत असत.
म.फुले यांच्या विचारांशी कोठेही तडजोड करू नये हे ध्येय
या अधिवेशनाच्या माध्यमातुन अनेक पोटजाती एकत्र याव्यात. परस्परांचे स्नेह संबंध व्दिगुणीत व्हावेत, विचारांचे आदान प्रदान व्हावे या उद्देशाने अधिवेशन होत असून मातीतुन हा समाज निर्माण झालेला आहे. म.फुले, यांच्या विचारांशी कोठेही तडजोड करू नये या ध्येयाने समाज मंडळ वाटचाल करीत आहे. पुर्वीच्या समस्या वेगळया होत्या आजच्या समस्या वेगळया आहेत. त्यानुसार या अधिवेशनात 20 ठराव मांडण्यात आले आहेत. श्रीमंतीचे प्रदर्शन टाळावे, डिजेचा वापर टाळावा, यासह सामाजिक शैक्षणिक घटकांसह समाज प्रबोधन, समुपदेशन, दिशा देण्याचे कार्य 21 संचालक मंडळ सदस्यांच्या माध्यमातुन मांडण्यात आलेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अधिवेशन स्थळी स्टॉलची मांडणी करण्यात आली असून समाजातील नवयुवकासह अनेकाना व्यसनाधिनतेपासून अलिप्त रहावे म्हणून पोस्टर प्रदर्शनाव्दारे देखिल समाज प्रबोधनाचे कार्य पार पाडले जाणार आहे.
या अधिवेशनात डॉ.प्रा.हिरालाल चव्हाण, डॉ.भास्कर महाजन, राकेश महाजन, बाजीराव महाजन, शशीकला महाजन, सोनाली जाधव यांचेसह नवयुवक मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.