प.वि.पाटील विद्यालयाचा उत्कृष्ट शाळा म्हणून गौरव

0

अन्नपूर्णा महोत्सवात सांस्कृतिक कलागुणांची उधळण

जळगाव दि, १७-

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व कसार सेवा संघ यांच्या द्वारा आयोजित भव्य अशा अन्नपूर्णा महोत्सवात दि.14 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाने आपल्या विविध कलागुणांचे दर्शन घडवत प्रेक्षकांना आकर्षित केल्याने आयोजकांच्या वतीने शाळेला सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर अफजलखानाचा वाध या पोवाड्या वर सुंदर असे संगीत नाट्य सादर केले तर वेडात दौडले वीर मराठे सात….हे समूह गीत गायन केले.आला आला आला माझा गणराज आला…, जोगवा… , एकविरा आई….अशा विविध गीतांवर नृत्य सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्या.रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक योगेश भालेराव ,सरला पाटील ,कल्पना तायडे ,दिपाली चौधरी आदींनी परिश्रम घेतले
अन्नपूर्णा महोत्सवाचे अध्यक्ष अतुल कासार , उपाध्यक्ष विजय कासार , सचिव साईनाथ कासार ,कोषाध्यक्ष प्रशांत कासार,संस्कृतिक कार्यक्रम अध्यक्ष पराग सरोदे, उपाध्यक्ष वैभव डिमके ,कासार नवयुवक मित्र मंडळ अध्यक्ष शेखर वैद्य ,कासार समाज महिला अध्यक्ष विद्या कासार , ललिता कासार, राजश्री कासार आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन उत्कृष्ट शाळा म्हणून गौरव करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.