85 घंटागाड्या मक्तेदाराला सुपूर्द

0

जळगाव- स्वच्छतेच्या एकमुस्त ठेक्याच्या कामाला सुरुवात होत असून मंगळवारी मक्तेदाराला 85 घंटागाड्या सुपूर्द करण्यात आल्या. मक्तेदार वॉटर ग्रेस कंपनीतर्फे सी.व्ही. भंगाळे यांनी घंटागाड्या ताब्यात घेत महापालिका प्रांगणातून त्या मेहरुण बगिच्यानजीक टी.बी. हॉस्पिटलच्या जागेत ठेवण्यात आल्या आहेत.

जुन्या मक्तेदारांचा मक्ता संपला
शहर स्वच्छतेसाठी आधी देण्यात आलेल्या मक्तेदारांचा मक्ता दि. 12 रोजी संपत आहे. त्यामुळे दि. 12 नंतर मक्तेदार कामाला सुरुवात करणार आहे. दि. 12 नंतर लगेचच स्वच्छतेत खंड पडायला नको म्हणून लगेचच सुरुवात करणार असल्याचे सी.व्ही. भंगाळे यांनी सांगितले. मनपा प्रांगणात सकाळी 85 गाड्यांसह दोन टीपरही मक्तेदाराकडे स्वाधीन करण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान उपस्थित होते.

विविध मार्केटची उपायुक्तांकडून पाहणी
सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी आज अचानक शहरातील गोलाणी मार्केट, फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट येथे भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी मार्केटमधील स्वच्छतेची पाहणी केली. कालच्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. नागरिकांच्या घरातही गटारे ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकाच्या घरात काही भागात पाणी शिरले होते. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या साथरोगांच्या अटकावासाठी शहर स्वच्छता आवश्यक असल्याने त्यांनी पाहणी करत आवश्यक सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.